Google Ad
Education Pimpri Chinchwad

पोदार स्कूल चिंचवड, मध्ये सोशेल मीडियाच्या माध्यमातून स्वतंत्रदिन उत्साहात साजरा!

महाराष्ट्र 14 न्यूज : करोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी प्रथमच विद्यार्थ्यांच्या उपस्थिती शिवाय स्वतंत्रदीन सर्व शाळांमध्ये साजरा करण्यात आला. चिंचवडच्या पोदार स्कूल मध्येही सोशल डीस्टन्स पाळून शाळेच्या प्राचार्य शहनाज कोटार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी सोशल मीडियाच्या लाईव्ह माध्यमातून कार्यक्रमाचे संचलन केले गेले होते. हा कार्यक्रम शाळेतील मुलांनी व, पालकांनी घरी बसून फेसबुक लाईव्ह द्वारे या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. सर्व उपस्थितांनी राष्ट्रीय ध्वजाला सलामी दिली त्यानंतर राष्ट्रगीत व ध्वजगीत सादर करण्यात आले. स्वातंत्र्यदिनानिमित्त घोषणा देण्यात आल्या. देशभक्ती पर समूहगीते सादर केली. वैयक्तिक शिक्षक व सहकार्‍यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर समूहगीताला विशेष दाद मिळाली.

Google Ad

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंजुश्री रोडे मॅडम यांनी केले. कार्यक्रमात सादर झालेल्या गीतांना वाद्यांची साथ श्री. गोपाल सुरूशे व श्री. उदय निवाने यांनी केली. अशा प्रकारे स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शालेय जीवनापासून कितीही दूर गेलो तरी शाळेतील आठवणी मात्र कायम आपल्या सोबत असतात असेही प्राचार्य शहनाज कोटार यांनी सांगितले.

Tags
Google Ad

About the author

Maharashtra14 News

150 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!