Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड शहर भाजपा आणि पिं. चिं. भाजपा किसान मोर्चाच्या वतीने च-होली बु. येथे दूध एल्गार आंदोलन!

महाराष्ट्र 14 न्यूज, (१ ऑगस्ट) : भाजपा प्रदेश अध्यक्ष आ.चंद्रकांतदादा पाटील वा शहराध्यक्ष आ.महेशदादा लांडगे यांच्या आदेशानुसार गाय दूधाला प्रतिलीटर १० रूपये अनुदान द्या, दूध भुकटीला निर्यात अनुदान द्या, दुधाला रास्त भाव द्या, दुधउत्पादकाला न्याय द्या. या मागण्यांसाठी आज पिंपरी चिंचवड शहर भाजप आणि पिंपरी चिंचवड भाजपा किसान मोर्चाच्या वतीने चऱ्होली बु. येथे दुध एल्गार आंदोलन करण्यात आले.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आज सगळ्या व्यवसायावर गंडांतर आले असताना शेतकऱ्याच्या अर्थचक्राला गती देण्याचे काम दुध व्यवसायाने केले आहे. अशा परिस्थीतित मात्र गेल्या काही दिवसापासून शासनाने दूधाचे दर कमी केले असल्याने थोड्याफार प्रमाणात सुरू असलेले शेतकऱ्यांचे अर्थचक्र मंदावले आहे. आणखी काही दिवस अशीच परिस्थिती राहीली तर शेतकऱ्यांचे कंबरडे मोडायला वेळ लागणार नाही. म्हणूनच दुध व्यवसायाला अधिक गती देण्याची गरज असताना तीन चाकी महाआघाडी सरकारने दुधाचे दर कमी करुन शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचे काम केले आहे.

Google Ad

या दुध दरकपातीचा जाब विचारण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या वेळी उपस्थित जनतेला दुध वाटप करून सदर विषयीचा निषेध करण्यात आला. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा आदरणीय उमाताई खापरे, पिंपरी चिंचवड भाजपा सरचिटणीस अमोलजी थोरात, राजाभाऊ दुर्गे, मोरेश्वरजी शेंडगे, मा.महापौर नितीनअप्पा काळजे, नगरसेविका सुवर्णाताई बुर्डे, मा. महिला अध्यक्षा शैलाताई मोळक, महिला अध्यक्षा उज्वला गावडे, कोषाध्यक्ष सचिनजी तापकीर, उपाध्यक्ष नंदू दाभाडे व किसान मोर्चाचे अध्यक्ष संतोषभाऊ तापकीर

भोसरी चऱ्होली भाजपा मंडल अध्यक्ष नगरसेवक राजेंद्र लांडगे, प्रभाग स्विकृत सदस्य अजितभाऊ बुर्डे,दिनेश यादव, पांडाभाऊ भालेकर, गीता महेंद्रू, कामगार आघाडीच्या राजश्रीताई जायभाय, कविताताई करदास, जेष्ठ नेते भाऊसाहेब तापकीर,रामदास बापू काळजे, भाजपा व्यापारी आघाडी उपाध्यक्ष दत्तातात्या तापकीर, प्रवीण काळजे संचालक- संत तुकाराम साखर कारखाना, संतोष पठारे चेअरमन- सावता माळी वीविध कार्यकारी सोसायटी, विकास आण्णा बुर्डे, रुपी नगर शिक्षण संस्थेचे संचालक रमेशशेठ भालेकर, बाळासाहेब पवार

कामगार आघाडीचे संजय बढे, प्रगतशील शेतकरी बाळासाहेब काटे,मंगेश ताम्हाणे,शंकर बुर्डे,सचिन मोरे,किसन यादव,शांताराम अप्पा तापकीर,चेअरमन सुरेशतात्या तापकीर,नि.शिक्षण अधिकारी विलास तापकीर,पुरुषोत्तमकाका जोशी,डॉ.सुधाकर काळे,उद्योजक गणेश तापकीर, उद्योजक उत्तम ताजणे, सामाजिक कार्यकर्ते रामदास कुटे, प्रगतशील शेतकरी सुनिलकाका तापकीर व आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

44 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!