Google Ad
Editor Choice Front Maharashtra Politics

मुंबईकरांनो पाणी जपून वापरा; ५ ऑगस्टपासून पाणी कपातीचे संकट !

महाराष्ट्र 14 न्यूज : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये पुरेसा पाणीसाठा नसल्याने पाच ऑगस्टपासून वीस टक्के पाणीकपात करण्यात आली आहे. त्या मुळे मुंबईच्या विविध भागांत पाणीटंचाईची समस्या भासणार आहे. यंदाच्या पावसाळ्यात जून व जुलै महिन्यात मुंबईस पाणीपुरवठा करणाऱ्या तलावक्षेत्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यानं पाणी टंचाईचा निर्णय मुंबई महापालिकेनं घेतला आहे.

जुलै महिन्यांच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख तलावांत फक्त सुमारे ३४ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहेत. हीच परिस्थिती यापुढेही राहिल्यास पावसाळ्यानंतरही महापालिकेकडे पुरेसा जलसाठा उपलब्ध होऊ शकणार नसल्याची भीती वर्तवण्यात येत आहे.

Google Ad

मुंबईत पाणी पुरवठा ३१ जुलैपर्यंत सुरळीत ठेवण्यासाठी पाणीपुरवठ्यात ५ ऑगस्टपासून २० टक्के पाणीकपात करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे. दरम्यान, ठाणे, भिवंडी महानगरपालिकांसह इतर गावांमध्येसुद्धा पाणीकपातीचे संकट ओढावणार आहे. सर्व नागरिकांना या कालावधीत जपून पाण्याचा वापर करावा असं आवाहन महापालिका प्रशासनातर्फे केलं आहे.

सुमारे दीड कोटी लोकसंख्या असलेल्या मुंबईची तहान भागवण्यासाठी मुंबई महापालिकेची अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, विहार व तुळशी ही सहा धरणे असून भातसा हे राज्य सरकारचे धरण आहे. सरकारला रॉयल्टी भरून पालिका भातसा धरणातून पाणी उचलते. सहा धरणांपैकी विहार व तुळशी ही तुलनेने खूपच लहान धरणे असून त्यांचा पाणीसाठा काही दिवस पुरेल इतकाच असतो. त्यामुळे सर्व भार अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तानसा व मोडकसागर या धरणांवर आहे. मागीलवर्षी झालेल्या पावसात सात धरणांमध्ये मिळून क्षमतेच्या ८२ टक्के इतका पाणीसाठा जमा झाला होता.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!