Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवडकरांची तहान भागवणारे पवना धरण भरत आले … रावेत बंधारा ओसंडून वाहू लागला!

महाराष्ट्र 14 न्यूज : गेल्या पंधरा दिवसांत मावळात पावसाने दमदार पुनरागमन केल्याने पवना धरण ८९.२९ टक्के भरले आहे . पिंपरीचिंचवडला पाणी पुरवठा करणारा रावेत बंधाराही ओसंडून वाहू लागला आहे, त्यामुळे पिंपरीचिंचवडकरांची पाण्याची चिंता आता मिटली आहे. मावळातील पवना , इंद्रायणी , सुधा , कुंडलिका या नद्याही दुथडी भरून वाहू लागल्या आहेत . पवना , वलवण , तुंगार्ली , शिरोता , उकसान , जाधववाडी , लोणावळा , मळवंडीठुले , कासारसाई , आढले या धरणांच्याही पाण्याची पातळी वाढत आहे . गेल्या २४ तासांत ११ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

गेल्या वर्षी आजपर्यंत सुमारे ३,१४९ मिमी पावसाची नोंद झाली होती . पवना धरण पाणलोट क्षेत्रात दिवसभरात ११ मिमी पावसाची नोंद झाली . धरणाचा पाणीसाठा ८९.३९ टक्के इतका झाला आहे . गत वर्षी आजअखेर धरणाचा साठा १०० टक्के झाला होता . यासह नाणे मावळातील वडीवळे धरण हे ८४.४० टक्के भरले आहे, धरणाच्या दरवाजातून विसर्ग सुरू करण्यात आलाआहे. या धरणामुळे नाणे मावळातील आणि इंद्रायणी नदीकाठच्या गावाचा पाणी प्रश्न मिटला आहे. नद्या , ओढे नाले ओसंडून वाहत आहेत . या पाण्याचा शेतीसाठी उपयोग होणार असल्याने शेतकऱ्यांमध्येही आनंदाचे वातावरण आहे.

Google Ad

Google Ad

About the author

Maharashtra14 News

132 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!