Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड महानगरपालिका आस्थापनेवरील पदांच्या पदोन्नती बाबत कर्मचारी महासंघाने आयुक्तांना दिले निवेदन!

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिका आस्थापनेवरील मुख्य लिपीक , कार्यालय अधिक्षक , प्रशासन अधिकारी इत्यादी पदांच्या पदोन्नती बाबतची मागणी पिंपरीचिंचवड कर्मचाऱ्यांच्या वतीने महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

या मागणीत महासंघाने म्हटले आहे, की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने ब – याच पदाची निर्मिती करणेत आलेली असून त्यानुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सर्व विभागाचे कामकाज चालते . सद्यस्थितीत प्रशासकीय संवर्गातील प्रशासन अधिकारी , कार्यालय अधिक्षक , मुख्य लिपीक इत्यादी पदांची अनेक पदे मनपामध्ये रिक्त आहेत . सध्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमधून सेवानिवृत्त होणा-या कर्मचा-यांचे प्रमाण वाढत असून रिक्त होणा-या जागावर नव्याने नोकरभरती होत नाही .

Google Ad

त्यामुळे सदर पदावरील कर्मचा-यांवर कामाचा ताण दिसून येत आहे . अनेक कर्मचारी एकाच पदावर सुमारे २० ते २५ वर्षे कामकाज करत आहे . एवढी प्रदिर्घ सेवा होवूनही पदोन्नती विना कर्मचारी सेवानिवृत्त होत आहे . त्यामुळे कार्यरत कर्मचारीही मोठ्या प्रमाणात नाराज आहेत . त्याचा मनपाच्या कामकाजावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे . प्रशासकीय सवंर्ग हा मनपाच्या कामकाजाचा प्रमुख कणा आहे . भविष्यकालीन विचार करता सदर पदावर कर्मचारी उपलब्ध होणे गरजेचे आहे . अन्यथा आगामी काळात कर्मचा-याअभावी अनेक पदे रिक्त राहण्याचा धोका आहे .

तसेच प्रशासन अधिकारी या पदावर शामन नियुक्त अधिकारी नियुक्त केले जात आहे . सदर अधिका-यांची नियुक्ती मनपा कर्मचा-यांवर अन्याय करणारी आहे . वास्तविक पाहता मनपातील पात्र कर्मचा – यांची प्रदिर्घ सेवा व अनुभव लक्षात घेता त्यांना पदोन्नती देणे आवश्यक आहे . पदोन्नतीसाठी कर्मचारी उपलब्ध न झाल्यास सदर पदावर मनपा मेवेतील कर्मचा-यांची मरळसेवा पध्दतीने निवड करणेत यावी . तरी रिक्त होणा-या पदावर तातडीने पात्र कर्मचा-यांना पदोन्नती देणेत यावी अशी मागणी पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

Tags
Google Ad

About the author

Maharashtra14 News

123 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!