Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ८ लसीकरण केंद्रात फ्रंट लाईन वर्कर्सना कोविड-१९ चे लसीकरण … ‘पिंपळे निलख’ दवाखान्याने गाठले ९४ टक्के लसीकरणाचे सर्वात मोठे लक्ष!

महाराष्ट्र 14 न्यूज : महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात  कोरोना विषाणूने एकच थैमान घातले होते. पिंपरी चिंचवड मध्येही कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती. मात्र, आता पिंपरी चिंचवड मधून थोडा दिलासा देणारी बातमी दररोज समोर येत आहे. कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. तसेच फ्रंट लाइन वर्कर्सना कोरोना ची लस देण्यात येत आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून याकरिता ड्राय रन घेण्यात आला व त्यानंतर शहरातील आठ रुग्णालयांची निवड करून या रुग्णालयात लस देण्याची व्यवस्था केली आहे .

या लसीकरण केंद्रावर कोरोनाच्या काळात जोखमीचे काम करणाऱ्या डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी, फार्मासिस्ट, तसेच खाजगी रुग्णांलयातील कर्मचाऱ्यांना प्राधान्याने १६ जानेवारी पासून ही लस देण्यात येत आहे. बुधवार (१० फेब्रुवारी २०२१) रोजी या आठ रुग्णालयांचा १८ दिवसांचा लेखाजोखा घेण्यात आला यात कोणत्या रुग्णालयात किती व्यक्तींना कोविड-19 लस देण्यात अली, याची टक्केवारी देण्यात आली आहे.

Google Ad

🔴कोविड-19 लसीकरण तक्ता ( पिंपरी चिंचवड मनपा )

यमुनानगर हॉस्पिटल – 58 %

नवीन भोसरी हॉस्पिटल – 48 %

नवीन जिजामाता हॉस्पिटल- 41 %

वाय सी एम हॉस्पिटल- 82 %

पिंपळे निलख दवाखाना- 94 %

कासारवाडी दवाखाना- 39 %

ई एस आय हॉस्पिटल- 36 %

तालेरा हॉस्पिटल- 63 %

महानगरपालिका 8 रुग्णांलयात सरासरी 59 % लसीकरण पूर्ण झाले असून यामध्ये पिंपळे निलख दवाखान्यात सर्वात जास्त म्हणजे 94 % लोकांनी यात सहभाग घेतल्याचे दिसून आले. सध्या या रुग्णालयात खाजगी रुग्णालये दवाखान्यातील डॉक्टर, कर्मचाऱ्यांना तसेंच पोलिस खात्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांना कोविड-19 लसीकरण करण्यात येत आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

12 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!