Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

आमदार ‘लक्ष्मण जगताप’ यांनी “या” कारणासाठी उपटले महापालिका आयुक्तांचे कान … पिंपरी-चिंचवडमधील खासगी कोविड रुग्णालयांकडून रुग्णांची लूट !

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ११ फेब्रुवारी ) : कोरोना आजारावर उपचार केल्यानंतर अव्वाच्या सव्वा बिल वसूल केलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील खासगी कोविड रुग्णालयांनी महापालिका आयुक्तांच्या आदेशानंतर देखील संबंधित रुग्णांना जादाची बिले परतफेड केलेली नाहीत. धक्कादायक बाब म्हणजे याबाबत महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून प्रसारमाध्यमांना दिशाभूल करणारी माहिती दिली जात आहे. त्यातून महापालिकेकडून एक प्रकारे या प्रकरणांवर पांघरून घालण्याचेच पाप केले जात आहे. त्यामुळे आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना खरमरीत पत्र लिहून त्यांचे कान उपटले आहेत. वसूल केलेले जादा पैसे संबंधित रुग्णांना सक्तीने परत करण्यास रुग्णालयांना भाग पाडावे आणि संबंधित रुग्णालयांवर कायदेशीर कारवाईचे आदेश देण्यास त्यांनी सांगितले आहे. त्याचप्रमाणे जादाची बिले रुग्णांना परतफेड करण्यात आली किंवा नाही याबाबत मला अवगत करावे, असेही आमदार जगताप यांनी आयुक्तांना बजावले आहे.

राज्यात कोरोनाचा कहर सुरू असताना सरकारी रुग्णालयांसोबत खासगी रुग्णालयांमध्येही कोरोना रुग्णांवर उपचार करण्याची मुभा सरकारने दिली होती. त्याचा गैरफायदा घेत खासगी कोविड रुग्णालयांनी रुग्णांकडून अक्षरशः लुट चालविली होती. त्यामुळे सरकारने कोरोना आजार झालेल्या रुग्णांसोबतच अन्य आजारांवरही किती उपचार खर्च लावायचा याचे नियम बनविले. त्याबाबत सरकारकडून सर्व रुग्णालयांना आदेश जारी करण्यात आला. त्यामुळे उपचाराच्या नावाखाली रुग्णांकडून लूट करणाऱ्या खासगी कोविड रुग्णालयांना चाप बसेल, अशी आशा होती. परंतु, मानवता हरवलेल्या आणि निर्ढावलेल्या खासगी कोविड रुग्णालयांनी सरकारच्या आदेशाला फाट्यावर मारत रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा बिले वसूल केली आहेत. अनेक रुग्णांच्या तक्रारीनंतर आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना जागे केले आणि रुग्णांची लूट थांबवण्याबाबत कठोर पावले उचलण्यास सांगितले.

त्यानंतर आयुक्तांनी खासगी कोविड रुग्णालयांनी रुग्णांकडून वसूल केलेल्या बिलांचे ऑडिट करण्याचे आदेश दिले. त्यामध्ये कोरोना रुग्णांवर उपचाराची परवानगी दिलेल्या बहुतांश खासगी कोविड रुग्णालयांनी बदमाशी केल्याचे कागदोपत्री निष्पन्न झाले आहे. अनेक रुग्णालयांनी कोरोना रुग्णांकडून सरकारने ठरवून दिलेल्या उपचार खर्चापेक्षा कितीतरी अधिक पटीने बिले वसूल केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर आयुक्त हर्डीकर यांनी ऑडिट झालेल्या रुग्णालयांनी जादाची बिले वसूल केलेले पैसे संबंधित रुग्णांना परत करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर काही रुग्णालयांनी संबंधित रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना पैसे परत केले आहेत. मात्र अनेक रुग्णालयांनी आयुक्तांच्या आदेशाला फाट्यावर मारून रुग्णांना पैसे परत केलेले नाहीत.

Google Ad

दुसरीकडे या प्रकरणात महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून प्रसारमाध्यमांना दिशाभूल करणारी माहिती दिली जात आहे. त्याद्वारे रुग्णांची लूट करणाऱ्या रुग्णालयांना पाठीशी घालण्याचाच प्रकार दिसून येत आहे. लुटले गेलेल्या रुग्णांनी संबंधित रुग्णालयांमध्ये वारंवार चकरा मारून देखील त्यांना दाद दिली जात नाही. रुग्णांना त्यांच्या हक्काचे पैसे परत मिळवून देण्याऐवजी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून या प्रकरणांवर पांघरून घालण्याचे पाप केले जात आहे. त्यामुळे खासगी कोविड रुग्णालयांकडून लूट झालेल्या अनेक रुग्णांनी आमदार लक्ष्मण जगताप यांच्याकडे धाव घेतली आहे. संबंधित रुग्णालये पैसे परत करत नसल्याच्या तक्रारी या रुग्णांनी केल्या आहेत.

नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन आमदार जगताप यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना खरमरीत पत्र लिहून त्यांचे कान उपटले आहेत. लूट झालेल्या रुग्णांना त्यांच्या हक्काचे पैसे परत मिळावेत यासाठी संबंधित खासगी कोविड रुग्णालयांना भाग पाडा, त्यांच्यावर राज्य सरकारच्या अधिसूचनेनुसार आणि आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार कडक कायदेशीर कारवाई करण्यास त्यांनी आयुक्तांना सांगितले आहे. सर्व रुग्णालयांनी आकारलेल्या बिलांचे पुन्हा ऑडिट करण्यात यावे. तसेच रुग्णांना जादा आकारलेल्या पैशांची परतफेड केली किंवा नाही याबाबत मला अवगत करण्यासही आमदार जगताप यांनी आयुक्तांना बजावले आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

5 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!