Google Ad
Editor Choice Maharashtra

शिवजयंतीची नियमावली जाहीर … ‘ या ‘ नियमांचं पालन करावं लागणार !

महाराष्ट्र 14 न्यूज : छत्रपती शिवाजी महाराज जयंती म्हणजेच शिवजयंती हा सण / उत्सव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्यानुसार दि . १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो . कोविड- १९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षी दि . १९ फेब्रुवारी , २०२१ रोजीचा ” छत्रपती शिवाजी महाराज जयंती ” उत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे .

राज्यातील कोरोनाचे संकट अजुनपर्यंत संपलेले नाही, त्याचे परिणाम विविध सार्वजनिक उत्सवांवर होत आहेत. दरवर्षी उत्साहात साजऱ्या हाेणाऱ्या शिवजयंतीवरही यंदा मर्यादांचे बंधन आले आहे. महाराष्ट्र सरकारने यंदाच्या शिवजयंती सोहळ्यावर बंधनं घालून सर्व शिवप्रेमींना यावर्षी जयंती साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन केले आहे.

Google Ad

अशा आहेत शासनाच्या मार्गदर्शक सूचना :

१. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी , १६३० रोजी शिवनेरीवर झाला होता . त्यामुळे अनेक शिवप्रेमी किल्ला शिवनेरी अथवा गड / किल्ल्यांवर जाऊन तारखेनुसार दि . १८ फेब्रुवारी रोजीच्या मध्यरात्री १२ वाजता देखील एकत्र येऊन शिवजयंती साजरी करतात . परंतु यावर्षी covid – १ ९ चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात एकत्र न येता साधेपणाने शिवजयंती उत्सव साजरा करणे अपेक्षित आहे .

२. दरवर्षी शिवजयंती साजरी करताना संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते . परंतु यावर्षी कोणत्याही प्रकारे सार्वजनिक ठिकाणी पोवाडे , व्याख्यान , गाणे , नाटक इत्यादींचे सादरीकरण अथवा इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये . त्याऐवजी सदर कार्यक्रमाचे केबल नेटवर्क अथवा ऑनलाइन प्रक्षेपण उपलब्ध करुन देण्याबाबत व्यवस्था करण्यात यावी .

३. तसेच , कोणत्याही प्रकारे प्रभात फेरी , बाईक रॅली , मिरवणुका काढण्यात येऊ नयेत . त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करुन त्या ठिक सोशल डिस्टन्सींगचे पालन करून फक्त १० व्यक्तींच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्याची परवानगी देण्यात येत आहे .

४. शिवजयंतीच्या दिवशी आरोग्यविषयक उपक्रम / शिबिरे ( उदा . रक्तदान ) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना , मलेरिया , डेंग्यू इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता यांबाबत जनजागृती करण्यात यावी .

५. आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन करताना त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सींग तसेच स्वच्छतेचे नियम ( मास्क , सॅनिटायझर इत्यादी ) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे .

६. covid – १९ च्या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन , आरोग्य , पर्यावरण , वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका , पोलीस प्रशासन , स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे .

तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे . महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या नियमांचे पालन यंदा शिवप्रेमींना करावे लागणार आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

33 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!