Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ३६६४ लाभार्थ्यांना मिळणार स्वस्तात घरे … नियमावली जाहीर!

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत केंद्रीय गृहनिर्माण व शहरी गरीबी निर्मुलन मंत्रालयाने निर्गमित केलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या मार्गदर्शन सुचनांचा अवलंब करुन ठिकठिकाणी आरक्षित जागांवर सर्वांसाठी घरे संकल्पनेवर आधारीत प्रधानमंत्री आवास योजना राबविणेत येत आहे.पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनेकरिता मा.महापालिका सभा ठराव क्र .३ ९ , दि .२० / ०६ / २०१७ मंजूर आहे .

सदर ठरावानुसार सद्यस्थिती च-होली , रावेत व बो-हाडेवाडी येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी घरे बांधणे प्रकल्प चालू आहेत . सदर प्रकल्पामध्ये १४ ते १५ मजली इमारतीमध्ये ३० चौ.मी. चटई क्षेत्राच्या सदनिका बांधणेचे नियोजन आहे . सदर योजना ही खाजगी भागीदारीद्वारे परवडणाऱ्या घरांची निर्मिती करणे ( Affordable Housing in Partnership ) या घटकाचा अवलंब करुन राबविणेत येत आहे . या घटकांतर्गत केंद्र शासनाकडून १.५ लक्ष व राज्य शासनामार्फत प्रति घरकुल र.रु .१ लक्ष इतके अनुदान अनुज्ञेय राहील .

Google Ad

पंतप्रधान आवास योजनेचे पिंपरी चिंचवड शहरातील इच्छुक लाभार्थीना लाभ करुन देणेकामी खालीलप्रमाणे प्रक्रिया पार पाडणेत येणार आहेत : १ ) दिलेल्या कालावधीमध्ये इच्छुक लाभार्थीने मनपाने दिलेल्या लिंकद्वारे आवश्यक फॉर्म ऑनलाईनभरुन , सदर फॉर्मची प्रिंट काढून तो नागरी सुविधा केंद्राकडे प्रस्तृत करावयाचा आहे .

२ ) नव्याने फॉर्म भरणारे – ज्या लाभार्थ्यांनी यापुर्वीच्या सर्वेक्षणात भाग घेतलेला नव्हता त्यांनी स्वतःचा फॉर्म व कागदपत्रे ( आधार कार्ड , रेशन कार्ड , पॅन कार्ड , वोटर कार्ड , जात प्रमाणपत्र , उत्पन्न दाखला , बँक पास बुक , वीजबिल , तीनप्रकल्पासाठी र.रु .५,००० / – ( डी.डी. ) डिमांड ड्राफ्ट आयुक्त , पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांचे नावे , २ पासपोर्ट आकाराचे फोटो , तपासणीसाठी पात्रता पडताळणी नागरी सुविधा केंद्राकडून करुन घेणे आवश्यक राहील व त्याच ठिकाणी सदर फॉर्म व कागदपत्रे वर रु .५००० / – चा D.D. जमा केलेनंतर पोहोच पावती देणेत येईल .

३ ) यापुर्वी फॉर्म भरलेले – ज्या लाभार्थीनी यापुर्वीच्या सर्वेक्षणामध्ये भाग घेऊन अर्ज सादर केला होता त्यांनी फक्त ऑनलाईन फॉर्म भरुन त्याची प्रती सह र.रु .५००० / – चा D.D. आयुक्त , पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांचे नावेजमा केलेनंतर पोहोच पावती देणेत येईल . तसेच मधील कालावधीत नियमानुसार उत्पन्नापेक्षा वाढ अथवा स्वतःचे मालकीचे घर घेतल्यामुळे पुर्वी फॉर्म भरलेल्यांपैकी सदर इच्छुक लाभार्थी सोडतीत भाग घेणेस अपात्र ठरतील

.४ ) क्र .२ नुसार सादर होणारे अर्ज नागरी सुविधा केंद्रामार्फत पडताळणी करावयाची झालेस सदर केंद्रांना आवश्यक प्रशिक्षण , माहिती व तंत्रज्ञान विभाग व CLTC मार्फत देणेत येईल व प्रत्यक्ष फॉर्मचे तपासणी व पडताळणी फी म्हणून नागरी सुविधा केंद्रास र.रु .२५ / – प्रति फॉर्म पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत अदा करणेत येईल , ५ ) सदर प्रक्रियेचा कालावधी ३० दिवस राहील .

६ ) सर्व पात्र लाभार्थ्यांची यादी ऑनलाईन वेबसाईटवर प्रसिध्द करुन लॉटरी पध्दतीने सोडत काढून प्रत्येक प्रकल्पाकरीताचे लाभार्थी निश्चित करणेत येतील . ७ ) इच्छुक लाभार्थीनी भरावयाच्या फॉर्ममध्ये तीन प्रकल्पांचा विकल्प भरणेस मुभा असेल . ८ ) र.रु .५००० / – ही सदनिकेच्या किंमतीतून वजावट करणेत येईल व सदनिका न मिळालेल्या लाभार्थीना सदर रक्कम परत करणेत येईल . ९ ) प्रतिक्षा यादी ठेवणे अथवा रद्द करणेचा कायदेशीर अधिकार मनपाने राखून ठेवलेले आहेत .

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील खालील प्रकल्पांची सद्यस्थितीत वाटप करण्याचे प्रस्तावित करणेत येत आहे . सदर प्रकल्पांना पर्यावरण दाखला व महारेरा अंतर्गत नोंदणी देखील करण्यात आलेली आहे . या प्रत्येक प्रकल्पांचे निविदेनुसार होणाऱ्या खर्चावर आधारीत प्रति सदनिका खर्च निश्चित केलेला आहे . प्रत्येक प्रकल्पासाठी लाभार्थी हिस्सा खालीलप्रमाणे प्रपत्र अनुसार येत आहे .

उपरोक्त तक्त्याप्रमाणे प्रति सदनिकेसाठी केंद्रशासन र रु .१.५० लाख , राज्य शासन र रु .१ लाख अनुदान देणार आहे . तसेच उर्वरित रक्कम हा लाभार्थी हिस्सा राहणार असून तो ३ टप्यांमध्ये ( ४० % + ४० % + २० % ) लाभार्थ्यांकडून घेण्यात येणार आहे . सदर प्रकल्पाचे आर्थिकदृष्ट्या अतिकार्यक्षम व अतिव्यवहार्य ( Most Economical Feasibility ) वसुलीच्या पर्यायापैकी लाभार्थीकडून घरकुलच्या किंमतीपोटी वसूल करावयाचे हिश्श्याची रक्कम वरीलप्रमाणे असून सदर रक्कम बांधकामाच्या ठराविक टप्प्यानंतर घेणेत येणार आहे . हिश्श्याचे टप्पे रेरा नियमानुसार ठेवण्यात आलेले आहे . तसेच सदर प्रकल्पामधील मुलभूत सुविधाविषयक ( Infra Work ) कामे , भाववाढ फरक अदायगी ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत करण्यात येणार आहे . म्हणजेच महानगरपालिकेचा आर्थिक सहभाग म्हणून सदर प्रकल्प मनपाचे जाग विर करणे व प्रकल्पातील सुविधा पुरविणेचा खर्च , विकास शुल्क माफी व भाववाढ खर्च , अस्थापना खर्च या स्वरुपात असणार आहे . सदर प्रकल्पांचे एकुण ३६६४ सदनिकांसाठी लाभार्थी व लाभार्थी हिस्सा व सोडत प्रक्रिया निश्चित करणेत येत आहे .

 

Tags
Google Ad

About the author

Maharashtra14 News

98 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!