Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी अंतर्गत ‘पिंपळे गुरव’ होणार अधिक स्मार्ट … रस्ते, लिनियन गार्डन चा होणार विस्तार!

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडच्या संचालक मंडळाची दहावी बैठक आज गुरुवार , दिनांक १३/०८/२०२० रोजी दुपारी १२.०० वाजता पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडचे कार्यालय , ऑटोक्ल्स्टर , चिंचवड येथे आयोजित करण्यात आलेली होती . सदर बैठकीस मा.अध्यक्ष , पीसीएससीएल श्री . नितीन करीर ( IAS ) , मा.संचालक श्रीमती ममता बत्रा , मा . संचालक तथा विभागीय आयुक्त , पुणे श्री.सौरभ राव , मा.संचालक , पीसीएससीएल तथा पोलीस आयुक्त , पिंपरी यांचे प्रतिनीधी हे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठकीस उपस्थित होते .

तसेच मा महापौर , पिंपरी चिंचवड महानगरपालिका तथा संचालक , पीसीएससीएल उषा ऊर्फ माई ढोरे , सत्तारुढ पक्षनेते तथा संचालक , पीसीएससीएल श्री . नामदेव ढाके , मा स्थायी समिती अध्यक्ष तथा संचालक , पीसीएससीएल श्री.संतोष ( आण्णा ) लोंढे , विरोधी पक्षनेते तथा संचालक , पीसीएससीएल श्री . नाना उर्फ विठ्ठल काटे , मुख्य व्यवस्थापकीय संचालक , पीएमपीएमएल तथा संचालक , पीसीएससीएल श्री राजेंद्र जगतापव , मा.आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी / संचालक , पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लि . श्री.श्रावण हर्डीकर हे उपस्थित होते.

Google Ad

या व्यतिरिक्त मुख्य वित्तीय अधिकारी श्री . जितेंद्र कोळंबे , सह मुख्य कार्यकारी अधिकारी श्री . निळकंठ पोमण व श्री.राजन पाटील , जनरल मॅनेजर इन्फ्रास्ट्रक्चर श्री . अशोक भालकर सभेस उपस्थित होते . सदर सभेमध्ये दि .३० / १२ / २०१ ९ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या नवव्या बैठकीचा सभावृत्तांत कायम करण्यात आला . माजी मा स्थायी समिती अध्यक्ष श्री.विलास मडिगेरी यांचे जागी सध्याचे मा.स्थायी समिती अध्यक्ष श्री.संतोष ( आण्णा ) लोंढे यांची निवड करण्यात आली . माजी मा.सभ गृह नेते श्री.एकनाथ पवार यांचे जागी मा.सभागृह नेते श्री.नामदेव ढाके यांची निवड करण्यात आली .

मा.माजी विभागीय आयुक्त , पुणे डॉ.दिपक म्हैसेकर यांचे जागी सध्याचे विभागीय आयुक्त श्री . सौरभ राव यांची निवड करण्यात आली . मा.पोलीस आयुक्त श्री.के पद्मनाभन यांचे जागी सध्याचे मा.पोलीस आयुक्त ( IPS ) श्री संदीप बिष्णोई यांची नियुक्ती करणेत आली . माजी व्यवस्थापकीय संचालक , पीएमपीएमएल श्रीमती नयना गुंडे यांचे जागी नवनियुक्त व्यवस्थापकीय संचालक श्री.राजेंद्र जगताप यांची नियुक्ती करण्यात आली . अर्थिक वर्ष २०१ ९ -२० च्या सुधारित अंदाजपत्रकाबाबत चर्चा करण्यात आली . तसेच अर्थसंकल्पात नवीन लेखाशीर्षाची निर्मिती व अर्थसंकल्पाच्या विनीयोगास मान्यत देणेत आली.

तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांना याबाबतचे अधिकार प्रदान करणेबाबत चर्चा होऊन त्यास मान्यता देणेत आली . पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लि.अंतर्गत पिंपळे गुरव येथील रस्ते , लिनियल गार्डन विस्तार , प्राथमिक आरोग्य केंद्राची सुधारणा करणे , म्युनिसिपल ई क्लासरुम प्रकल्पाच्या अंमलबजावणीच्या कामकाजावर देखरेख व नियंत्रण ठेवणेकामी पी.एम. यु.मार्फत अतिरिक्त मनुष्यबळ नेमणे , Auditorium & Broadcasting ( सभागृह व प्रसारण ) विकासाच्या अहवालास मान्यता देणे , School Health Monitoring – Detailed System Design अहवालास मान्यता देणे , Public Toilet Master Plan तसेच PPP तत्त्वावर सदर प्रकल्पाची अंमलबजावणी करणे इत्यादी विषयांवर चर्चा होऊन सदर विषय मान्य करणेत आले .

त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लि . करता तयार करण्यात आलेल्या SPV Business Plan बाबत चर्चा करण्यात येऊन पुढील सभेत आढावा घेऊन अंतिम आराखडा सादर करणेबाबत सूचना करण्यात आल्या . पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडच्या पॅन सिटी प्रकल्पांतर्गत व्हेरिएबल मेसेज साइनबोर्ड , सिटी मोबाईल ऍप , स्मार्ट कियॉस्क व वाय – फाय सारख्या डिजीटल सेवा मोफत देणेकामी मोनेटायझिंग एजन्सी म्हणून मे . Lemma Technogies यांची नियुक्ती करणे , सर्व आय . टी . पायाभूत सुविधांची तपासणी करण्यासाठी त्रयस्थ तपासणी एजन्सी म्हणून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय , पुणे यांची नियुक्ती करणे , मे . E & Y या प्रकल्प सल्लागार कंपनीस तांत्रिक सल्लागारपदी मुदतवाढ देणे इत्यादी विषयांवर चर्चा होऊन मान्यता देणेत आली .

Tags
Google Ad

About the author

Maharashtra14 News

20 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!