Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड मनपाने मिळकतकर थकबाकीदारांची यादी केली प्रसिद्ध … ‘अभय योजनेचा’ लाभ घेण्याचे केले आवाहन!

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिका करसंकलन विभागामार्फत चालू वर्षात मिळकत करापोटी 495 कोटी रुपये वसूल झाले आहेत . अंदाजपत्रकीय उद्दीष्टापेक्षा 375 कोटी रुपयांनी मिळकत कर वसूल कमी असल्याने महानगरपालिकेमार्फत मोठ्या थकबाकीदारांच्या मिळकती जप्त करणे अथवा जप्ती अनुषंगिक कठोर कारवाईची सुरु आहे . तसेच अशाप्रकारची कारवाईही मार्च महिन्यानंतरही सातत्याने सुरु राहणार आहे . शासनाने एक वेळची विशेष बाब म्हणून अवैध बांधकाम शास्ती वगळून मूळ कर भरणा करण्यासाठी 31 मार्च 2021 पर्यतच सवलत दिलेली आहे .

त्यानंतर कठोर कारवाईद्वारे थकबाकी वसूल करणेचे निर्देश दिलेले आहेत . तसेच जास्तीत जास्त नागरिकांनी मिळकत कराचा भरणा करणेचे दृष्टीने 31 मार्च 2021 अखेर थकबाकीसह संपूर्ण कराचा भरणा करणा – या मिळकतधारकांना मनपा शास्ती करामध्ये ( विलंब दंड ) 75 % सवलत देण्यात येत आहे . आजअखेर सदर सवलत योजने अंतर्गत 7401 मिळकतधारकांनी लाभ घेतला असून 88.49 कोटी रुपये मिळकत कराचा भरणा केला आहे . परंतु वरील सवलती लागू असूनही ज्या मिळकतधारकांनी अद्यापही मिळकत कराचा भरणा केला नाही व ज्यांची थकबाकी 25 लाखापेक्षा जास्त आहे .

Google Ad

अशा थकबाकीदारांची यादी महापालिकेच्या http://www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द केली असून त्यांची नावे क्षेत्रिय कार्यालय व विभागीय कार्यालयाचे दर्शनी भागात प्रसिध्द करण्यात येणार आहे . नागरिकांच्या सोईच्या दृष्टीने सर्व करसंकलन विभागीय कार्यालयात साप्ताहिक व सार्वजनिक सुट्टीचे दिवशी मिळकत कराची रक्कम रोख / धनादेश / डिमांड ड्राफ्टद्वारे भरणा करता येईल .

तसेच महानगरपालिकेचे http://www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर मिळकत कर भरणेकामी ऑनलाईन सुविधा उपलब्ध आहे . सर्व मिळकतधारकांनी मिळकत कराच्या विविध सवलत योजनांचा लाभ घ्यावा व आपल्या थकीत मिळकत कराचा भरणा 31 मार्च पूर्वी करावा असे विनम्र आवाहन करण्यात येत आहे , अन्यथा कठोर कारवाईस सामोरे जावे लागेल याची कृपया दखल घ्यावी . अशी माहिती आयुक्त राजेश पाटील यांनी दिली आहे.

http://अन्यथा पिंपरी चिंचवड मध्ये लॉकडाउन? … महानगरपालिकेने घेतला शहरातील कोरोनाच्या वाढणाऱ्या परिस्थितीचा आढावा https://maharashtra14news.com/otherwise-lockdown-in-pimpri-chinchwad-the-corporation-took-stock-of-the-growing-situation-of-corona-in-the-city/

Google Ad

About the author

Maharashtra14 News

8 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!