Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

अन्यथा पिंपरी चिंचवड मध्ये लॉकडाउन? … महानगरपालिकेने घेतला शहरातील कोरोनाच्या वाढणाऱ्या परिस्थितीचा आढावा

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड शहरात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे.  नागरिकांनी अनावश्यक गर्दी करुन कोरोना नियमांचे उल्लंघन करु नये अन्यथा शहराला लॉकडाऊनला सामोरे जावे लागेल.  त्यामुळे प्रत्येकाने जबाबदारीचे भान ठेऊन कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करुन सहकार्य करावे असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.  कोरोना प्रतिबंधक लस शहरातील प्रत्येक नागरिकाला मोफत देण्यासाठी महापालिकेने नियोजन करावे अशी सूचनाही महापौर ढोरे यांनी यावेळी महापालिका प्रशासनाला केली.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात रुग्णांचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा सर्वंकष आढावा तसेच कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्रांच्या व्यवस्थापनाची माहिती घेण्यासाठी महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली, त्यावेळी त्या बोलत होत्या.

Google Ad

यावेळी आयुक्त राजेश पाटील यांच्यासह पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेता राजू मिसाळ, स्थायी समिती सभापती           अॅड. नितीन लांडगे, शिवसेना गटनेते राहूल कलाटे, अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे, क्रीडा कला साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती उत्तम केंदळे, नगरसदस्य अंबरनाथ कांबळे, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, अजित पवार, उल्हास जगताप, अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, सर्व क्षेत्रीय अधिकारी आणि झोनल रुग्णालयांचे सर्व ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी बैठकीस उपस्थित होते.

शहरातील कोरोना बाधितांची संख्या वाढत असून त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेने केलेल्या उपाययोजनांची माहिती या बैठकीत घेण्यात आली.  शहरातील मुख्य बाजारपेठा, चौक, भाजी मार्केट अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी आढळून येत आहे.  त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिका प्रशासनाने कडक पावले उचलावीत असा आदेश महापौर ढोरे यांनी प्रशासनाला दिला.  भरारी पथकाद्वारे तपासणी मोहिम अधिक गतीमान करावी.  नागरिकांना लसीकरणासाठी घरापासून दूर जावे लागणार नाही यासाठी दाट लोकवस्तीच्या भौगोलिक रचनेनुसार लसीकरण केंद्राची उभारणी करून त्याठिकाणी पुरेशी सुरक्षा यंत्रणा ठेवावी अशा सूचनादेखील महापौरांनी यावेळी केल्या.  नागरिकांनी कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करुन महापालिकेला सहकार्य करावे असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी यावेळी केले.

कोरोना प्रतिबंधक उपाययोजना नियोजनाबाबत सर्व गटनेत्यांना महापालिका प्रशासनाने अवगत करावे अशी सूचना पक्षनेते नामदेव ढाके यांनी केली.  रूग्णवाढ कायम राहिली तर महापालिकेचे नियोजन सर्वंकष असले पाहिजे.  शहरातील कोरोना बाधित रुग्णांना उपचारासाठी कसलीही अडचण भासणार नाही याची दक्षता महापालिका प्रशासनाने घ्यावी.  लसीकरण केंद्रात पुरेसे मनुष्यबळ असावे अशा सूचनाही ढाके यांनी यावेळी केल्या.

विरोधी पक्षनेता राजू मिसाळ म्हणाले, कोवीड प्रतिबंधक लसीकरण कामकाजासाठी खासगी रुग्णालयाने पुढाकार घेऊन महापालिका प्रशासनाला सहकार्य करावे आणि आपली यंत्रणा उपलब्ध करून द्यावी.  नागरिकांच्या सोयीच्या ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू कराव
स्थायी समिती सभापती अॅड. नितीन लांडगे म्हणाले, लसीकरण केंद्रासाठी पुरेसे मनुष्यबळ आणि आवश्यक सुरक्षा तसेच कोरोना विषयक सुविधा पुरवावी.  महापालिका रुग्णालये अद्यावत सुविधांनी सज्ज ठेवावे. नागरिकांना मोफत कोरोना प्रतिबंधक लस देण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यासाठी महापालिकेने पुढाकार घ्यावा.

कोरोना रुग्णवाढीचा वेग नियंत्रित ठेवण्यासाठी विविध उपाययोजनांवर भर दिला जात असून महापालिकेचे रुग्णालये सर्व सुविधांनी अद्यावत असावे यासाठी महापालिका प्रशासन काम करीत आहे असे सांगून आयुक्त राजेश पाटील म्हणाले, कोरोना बाधित रूग्ण होम आयसोलेशनला प्राधान्य देत आहेत.  बेड मॅनेजमेंट चांगले होण्यासाठी प्रशासनाने महापालिका रुग्णालये आणि खासगी रुग्णालये यांचा आराखडा तयार केला आहे.  महापालिका रूग्णालयांमध्ये पुरेसा औषध साठा आणि मनुष्यबळ याकडे बारकाईने लक्ष दिले जात आहे.  लसीकरण केंद्रांची उभारणी शहरातील विविध भागात केली जात असून क्षेत्रीय अधिका-यांना केंद्राचे योग्य ठिकाण निवडून तेथे केंद्र सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.  कोरोना विषयक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून दिले आहे, अशी माहिती आयुक्त राजेश पाटील यांनी यावेळी दिली.

कोरोना संबंधित नियमांचे उल्लंघन करणा-या नागरिकांवर कारवाई करण्याचे आदेश आयुक्त पाटील यांनी प्रशासनाला दिले.  लग्न अथवा इतर कार्यक्रमाच्या ठिकाणी परवानगीपेक्षा अधिक संख्या आढळल्यास आयोजकांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत असा आदेश त्यांनी क्षेत्रीय अधिका-यांना दिला.  भरारी पथकांची तपासणी मोहिम अधिक प्रभावीपणे राबवावी असेही आयुक्त पाटील यांनी सांगितले.  सूचना देऊनही अनावश्यक गर्दी होत असलेल्या चौक परिसरात कलम १४४ लागू करावा लागेल असेही आयुक्तांनी यावेळी स्पष्टपणे सूचित केले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

63 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!