Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

कोरोनाच्या येणाऱ्या लसी करीता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची जय्यत तयारी … काय, आहे नियोजन, आणि मार्गदर्शक सूचना!

महाराष्ट्र 14 न्यूज , ( दि .१५ डिसेंबर ) : – कोविड -१९ वैश्विक महामारीच्या नियंत्रणासाठी कोविड -१९ लस निर्मितीसाठी मोठया प्रमाणावर प्रयत्न करण्यात येत आहेत . या अनुषंगाने आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार यांनी आगामी कोविड १९ लसीकरण नियोजनासाठी भारत देशातील सर्व शासकिय व खाजगी आरोग्य सेवा कर्मचारी ( HCW ) यांची माहिती अहवाल ( डाटाबेस ) संकलन करण्याचे काम सुरु केके आहे .

पिंपरी चिंचवड शहरातील शासकिय , मनपा व खाजगी आस्थापना आरोग्य व वैद्यकिय क्षेत्रातील नोंदणीकृत अधिकारी व कर्मचारी यांना कोवीड -१९ प्रतिबंधक लस देण्याचे नियोजन करण्यात येत आहे . त्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे आस्थापनेवरील वैद्यकिय अधिकारी -७३ , पी.एच.एन. – ०८ , स्टाफनर्स- २१ , ए.एन.एम.- १३६ व आशा स्वयंसेविका -१४८ एवढे मनुष्यबळ उपलब्ध आहे . कोवीड -१ ९ लसी साठी ३२ शितसाखळी केंद्रे आहेत व २६ ९ ५ लिटर क्षमतेची जागा उपलब्ध आहे . राज्यस्तरिय प्रशिक्षण दि .१४ / १२ / २०२० व दि .१५ / १२ / २०२० तारखेला झालेले आहे .

Google Ad

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकिय अधिकारी व पी.एच.एन. यांचे प्रशिक्षण दि .१६ / १२ / २०२० व दि .१७ / १२ / २०२० रोजी आयोजित केलेले आहे . पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या इतर आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेविका यांचे प्रशिक्षण वैद्यकिय अधिकारी व पी.एच.एन. यांचे मार्फत दवाखाना / रुग्णालय स्तरावर आयोजित करण्यात येत आहे .

राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोविड -१९ प्रतिबंधक लस पहिल्या टप्प्यात पिंपरी चिंचवड शहरातील शासकिय , मनपा व खाजगी आस्थापना आरोग्य व वैद्यकिय क्षेत्रातील नोंदणीकृत अधिकारी व कर्मचारी यांना देण्यात येणार आहे . पिंपरी चिंचवड महानगरपालिका , वैद्यकिय विभागामार्फत सर्व खाजगी वैद्यकिय व्यवसायिक यांना आवाहन करण्यात येते की , कोविड -१ ९ प्रतिबंधक लस घेण्याबाबतची नोंदणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्मार्ट सारथी ऍप वर त्वरीत करावी असे आवाहन अति.आरोग्य वैद्यकिय अधिकारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी , पुणे यांनी केले आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

11 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!