Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

ऑक्सिजन पुरवठ्याबाबत पिंपरी चिंचवड महानगरपालिका सतर्क … ऑक्सिजन समितीची घेत आहे, काळजी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. २१ एप्रिल) : ऑक्सिजन पुरवठ्याबाबत पिंपरी चिंचवड मनपाच्या जम्बो कोविड , अँटो क्लस्टर व इतर रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा गेल्या २ दिवसापासून जाणवत होता . परंतू , ऑक्सिजन संपला अशी परिस्थिती नव्हती . तरी सुध्दा काल रात्री आयुक्त राजेश पाटील यांच्या निर्देशानुसार ऑक्सिजन समन्वयक स्मिता झगडे , उपायुक्त , पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी मा.विभागीय आयुक्त , मा.जिल्हाधिकारी यांच्या विशेष सहकार्यामुळे काल रात्री तीन टॅकर द्वारे सुमारे २२ टन ऑक्सिजन मे.सहानी , मे.आयनॉक्स व मे.एअर लिक्वीड यांचेमार्फत उपलब्ध करुन घेतला आहे .

Google Ad

सद्यस्थितीमध्ये जम्बो कोविड , अँटो क्लस्टर , गवळी माथा व इतर ठिकाणी असलेल्या कोविड सेंटरला आवश्यक तेवढा ऑक्सिजनचा साठा उपलब्ध करुन घेतला आहे . तसेच वेळोवेळी असा साठा उपलब्ध व्हावा यासाठी अन्न व औषध प्रशासन सोबत समन्वय ठेवून ऑक्सिजन पुरवठा उपलब्ध करुन घेण्याचे काम अविरत चालू आहे . तसेच खाजगी रुग्णालयांसाठी समन्वयक श्रीम.स्मिता झगडे यांनी ऑक्सिजन पुरवठ्यासंबंधी आलेले सर्व फोन कॉल स्विकारुन संबंधित खाजगी रुग्णालयांना देखील ऑक्सिजनचे जम्बो सिलेंडर उपलब्ध करुन दिलेले आहेत . काल रात्री दि .२० / ०४ / २०२१ रोजी ऑक्सिजन नाही म्हणून कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडलेली नाही .

सद्यस्थितीमध्ये कोविड -१ ९ अंतर्गत ऑक्सिजन व्यवस्थापन समिती ( Oxygen Monitoring Team ) पाहण्यासाठी खालीलप्रमाणे नियुक्ती करण्यात आलेली आहेत .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

96 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!