Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड महानगरपालिका करणार … खाजगी रुग्णालयांच्या कोविड रुग्णांच्या वैद्यकीय बिलांचे ऑडिट!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२१एप्रिल) : खाजगी रुग्णालयातील वैद्यकिय बिलांचे पुर्व / अंतिम लेखापरिक्षण करणेबाबत कोविड -१९ उपचारासाठी पिंपरी चिंचवड मनपाने शंभराहून अधिक रुग्णालयांना कोविड रुग्णालय म्हणून मंजूरी दिलेली आहे . तेथील बेड मॅनेजमेंट साठी माहिती मिळणे यासाठी कनिष्ठ अभियंता यांची समन्वयक म्हणून नेमणूक केलेली आहे .

अशा रुग्णालयात दाखल झालेल्या कोविड बाधित रुग्णांची वैद्यकीय बिले वाजवी पेक्षा अधिक आल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने पिंपरी चिंचवड महानगरपालिका मुख्य लेखापरिक्षक श्री.आमोद कुंभोजकर यांची नियंत्रण प्रमुख व त्यांच्या सोबत श्री.किशोर बाबुराव शिंगे , लेखाधिकारी , श्री.पद्माकर नारायण कानिटकर , लेखाधिकारी यांची तसेच तांत्रिक बाबींसाठी श्री.दिपक पाटील , श्री.संजय काशिद , उपअभियंता यांची नेमणूक करणेत आलेली आहे . प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयनिहाय आठ पथके निर्माण केलेली आहेत . प्रत्येक पथकामध्ये त्या क्षेत्रीय कार्यालयातील जेष्ठ वैद्यकीय अधिकारी , लेखाधिकारी , लेखापाल , उपलेखापाल , मुख्य लिपिक , लिपिक व कनिष्ठ अभियंता असे प्रत्येकी आठ जणांचे पथक दि .१ ९ / ०४ / २०२१ पासून सुरु केलेले आहेत . सदर पथकाकामार्फत खाली नमुद नुसार काम करण्यात येणार आहे .

Google Ad

१ ) पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील खाजगी हॉस्पिटल मध्ये शासकीय दरानुसार बिल आकारले जाईल याबाबत पुर्व पडताळणी ( प्री – ऑडीट ) करणे .

२ ) हॉस्पिटलचे प्रथम ड्राफ्टबिल दिलेनंतर त्याची तपासणी नियुक्त केलेल्या ऑडीट पथकामार्फत ऑडीट केल्यानंतर रुग्णाला अंतिम बिल देणेबाबत रुग्णालयांना सूचना देणे .

३ ) खाजगी रुग्णालयामार्फत आकारल्या जाणाऱ्या सर्व देयकांचे पथकामार्फत लेखापरिक्षण करणे .

४ ) बीलांमध्ये निदर्शनास येणाऱ्या त्रुटींचे जागेवरच वेळीच निराकरण करणे .

५ ) नव्याने खाजगी रुग्णालये अधिग्रहित केल्यास त्याबाबतही अशाच पध्दतीने कार्यवाही करणे .

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!