Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भागवतेय रुग्णांची भूक … कोविड सेंटरमध्ये मोफत जेवण आणि अल्पोपहाराची केली व्यवस्था!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२१एप्रिल) : राज्य सरकारने गोरगरीब व गरजवंतांना स्वस्तात जेवण उपलब्ध व्हावे, यासाठी शिवभोजन थाळी देण्याची योजना गत वर्षापासून हाती घेतली आहे. अशाच प्रकारे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मनपाच्या कोविड सेंटर मध्ये रुग्णांना जेवण आणि नाष्ठा देण्यात येत आहे. जेवणात उत्कृष्ट प्रकारचे वरण-भात, चपाती-भाजी, सेलेंड तसेच अल्पोपहारात अंडी, उपमा असे वेगवेगळे मेनू दिले जातात.

महानगरपालिकेच्या या उपक्रमामुळे कष्टकरी, गोरगरीब, मजूर रुग्णांना मोठा आधार रुग्णालयात उपचार सुरू असताना मिळाला असल्याने नातेवाईकांना दिलासा मिळाला आहे. कोरोनाच्या या संकट काळात कोणत्याही गरजवंताची परवड होऊ नये, यासाठी महानगरपालिकेने हा उपक्रम हाती घेतल्याने शहरातील नागरिकांकडून त्याचे कौतुक होत आहे.

Google Ad

 

या उपक्रमात महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील स्वतः जातीने लक्ष घालताना तसेच अधिकाऱ्यांना सूचना करताना दिसत आहेत. या सर्वांवर महानगरपालिकेचे प्रवक्ते शिरीष पोरेडी सर्व गोष्टींचा समन्वय साधून बारीक लक्ष ठेऊन सर्वांना योग्य उपचार, जेवण, औषधे व्यवस्थित कशी मिळतील याची काळजी घेताना दिसत आहेत. खरच हे अधिकारी आणि कर्मचारी आपल्या जीवाची, कुटुंबाची पर्वा न करता अहोरात्र धडपडत आहेत, या सर्वांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. आता खरी गरज आहे, ती नागरिकांच्या सहकार्याची तर आणि तरच या सर्वांची मेहनत सार्थ ठरेल हे मात्र नक्की!

काळजी घ्या, काळजी करू नका!
घरातच रहा, आणि इतरांनाही सांगा!

Tags
Google Ad

About the author

Maharashtra14 News

3 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!