Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

छटपुजा सणाच्या निमित्ताने लोकहितास्तव व सार्वजनिक हित लक्षात घेऊन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे आदेश निर्गमित!

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिका , मनपा क्षेत्रामध्ये कोवीड -१९ च्या प्रसारास प्रतिबंधित करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात सजगतेने व सतर्क राहून छट पुजा सण साजर करणे बाबत आदेश निर्गमित करण्यात आले आहेत . छटपुजा ही तलाव / नदी किनारी सुर्यास्त व सुर्योदयाच्या कालावधी दरम्यान उत्तर भारतीय जनसुदायामार्फत केली जाते . सदर पुजेदरम्यान जमा होणारे निर्माल्य पाण्यात विसर्जित केले जाते . या अनुषंगाने सर्व भाविक तलाव / नदी किनारी जमा होतात .

नागरिक पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात कोविड – १९ च्या माहामारीचा सामना मार्च २०२० पासुन करीत असुन दिवाळी उत्सव व हिवाळा लक्षात घेता दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे . छट पुजे दरम्यान होणारी गर्दी लक्षात घेता सदर ठिकाणी गर्दिमुळे कोविड १९ मार्गदर्शक तत्वांचे विशेषत : सामाजीक अंतर राखणे इत्यादी चे पालन छटपुजेसाठी येणाऱ्या भाविकांकडुन शक्य होईल असे दिसुन येत नाही . त्यामुळे कोविड १९ विषाणुचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही . तसेच दिल्लीमध्ये सामूहीक छटपुजेस कोविड १९ महामारीच्या अनुषंगाने बंदी घातलेली आहे .

Google Ad

त्यामुळे पिंपरी चिंचवड मनपाने व्यापक लोकहीताच्या दृष्टीने आणि नागरिकांनी अधिक सजग राहुन छट पुजा उस्तवाचे आयोजनाबाबत खालिलप्रमाणे आदेश निर्गमित केले आहेत.
१ ) तलाव / नदी किनारी छटपुजेस होणारी गर्दी लक्षात घेता कोविड १ ९ मार्गदर्शक तत्वांचे विशेषत : समाजीक अंतर राखणे इत्यादी चे पालन होणार नाही , त्या अनुषंगाने तलाव / नदी किनारी अथवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी छटपुजेस परवानगी देण्यात येणार नाही त्यामुळे अशा ठिकाणी भाविक जमा होणार नाहीत याची पोलिस विभागाने दक्षता घ्यावी .
२ ) भाविकांनी छटपुजा घरगुती पद्धतीने साजरी करावी . खाजगी जागेत / घरात सुद्धा छटपुजा करताना सामाजिक / शारिरीक अंतर राखण्यात येईल याची आयोजकांनी / नागरिकांनी खबरदारी घ्यावी .

३ ) कोविड विषयक घ्यावयाची महत्वाची खबरदारी , संबंधित नियम याबाबत देखील उपायुक्त / सहाय्यक आयुक्त क्षेत्रिय अधिकारी , पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी आपल्या कार्यक्षेत्रात सातत्याने जनजागृती करावयाची आहे . तसेच या अनुषंगाने नियम भंग करणाऱ्यांवर , मास्क सुयोग्य पद्धतीने परीधान न करणे , रस्त्यावर धुंकणे , विना परवानगी कार्यक्रम आयोजीत करणे , गर्दी करण्यांवर दंडात्मक कारवाई उपायुक्त / सहाय्यक आयुक्त क्षेत्रिय अधिकारी व पोलीस प्रशासन यांनी नियमितपणे करावयाची आहे .
४ ) यापुर्वी वेळोवेळी परवानगी देण्यात आलेले सर्व उपक्रम , त्याकरीता निर्गमित केलेल आदेश व मार्गदर्शक सूचनांनुसार पुढील आदेशापर्यंत सुरु राहतील .

५ ) संदर्भिय आदेशान्वये वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश / मार्गदर्शक सूचना पुढील आदेशापर्यंत लागू राहतील .
६ ) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने यापुर्वी निर्गमित केलेले आदेश / मार्गदर्शक सूचना पुढील आदेशापर्यंत लागू राहतील .

कोवीड -१९ च्या प्रतिबंधासाठी या कार्यालयाव्दारे वेळोवेळी निर्गमित करणेत आलेल्या आदेशांचे , मार्गदर्शक सुचनांचे उल्लंघन करणारा व्यक्ती कारवाईस पात्र राहील . तसेच हे आदेश १८ नोव्हेंबर पासून पुढील आदेश येईपर्यंत पिंपरी चिंचवड क्षेत्रात लागू राहतील असे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून कळविण्यात आले आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

3 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!