Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

BMW जवळ लघुशंका करताना हटकल्याचा राग … पिंपरीत रिक्षाचालकाने सुरक्षारक्षकाला पेटवले!

महाराष्ट्र 14 न्यूज : बीएमडब्ल्यू कंपनीच्या आलिशान गाडीजवळ लघुशंका करताना हटकल्याच्या रागातून रिक्षाचालकाने वॉचमनला पेटवले. पिंपरी चिंचवडमधील भोसरी एमआयडीसी सेक्टर दहा भागात हा धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती आहे. जखमी सुरक्षारक्षकावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सुरक्षारक्षकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना काल (मंगळवार १७ नोव्हेंबर) दुपारी घडली. भगवान शंकर वायफळकर असं ४१ वर्षीय सुरक्षा रक्षकाचं नाव आहे. हा प्रकार एस व्ही एन्टरप्रायजेस कंपनीजवळ घडला.

नेमकं काय घडलं?
भगवान वायफळकर हे एस व्ही एन्टरप्रायजेस या रिक्षाचे पार्ट बनवणाऱ्या कंपनीमध्ये सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्या कंपनीसमोर वायफळकर यांच्या मालकाची बीएमडब्लू कार पार्क केली होती. महेंद्र बाळू कदम हा ३१ वर्षीय रिक्षाचालक मंगळवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास गाडीजवळ लघुशंका करत असताना वायफळकरांना दिसला.
आरोपी महेंद्र कदमला वायफळकर यांनी अडवले आणि जाब विचारला. यावेळी दोघांमध्ये वादावादी झाली. त्यामुळे संतापलेल्या आरोपीने वायफळकर यांच्या अंगावर आपल्याजवळ असलेल्या बाटलीतील पेट्रोल टाकले.

Google Ad

त्यानंतर स्वतःजवळ असलेल्या लायटरने त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. वायफळकरांना पेटवल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला. या प्रकारात सुरक्षारक्षक भगवान वायफळकर हे २० टक्के भाजले आहेत. त्यांच्यावर डी वाय पाटील या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर आरोपी महेंद्र कदम याच्यावर कलम ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल करुन त्याला अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे यांनी दिली आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

65 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!