Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

रोटरी क्लब आणि सहगामीचा … धनत्रयोदशीच्या आनंदमयी दिनी ‘आपुलकीचे ब्लॅंकेट आणि आनंदाचा सदरा’ उपक्रम!

महाराष्ट्र 14 न्यूज :

बांटने से खुशीया बढती है
आओ थोडी मुस्कान उनके चेहरे पर भी लाओ !!

रोटरी क्लब ऑफ वाल्हेकर वाडी व सहगामी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या आपुलकीचे ब्लँकेट आणि आनंदाचा सदरा उपक्रमाचा पहिला टप्पा धनत्रयोदशी च्या आनंदमयी मुहुर्तावर ” मस्ती कि पाठशाला” च्या प्रांगणात मोठ्या आनंदात पार पडला,यावेळी या शाळेसतील वंचित मुलांना नवीन कपडे, ब्लॅंकेट वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तसेच यावेळी रोटरी चे CSR , झोनल चेयर, प्रोजेक्ट व एन्व्हायरमेंट रो. चंद्रकांत पाटील यांच्या वतीने या मुलांना मिठाईचे वाटप करण्यात आले

Google Ad

यावेळी रो. चंद्रकांत पाटील, रो जिग्नेश अग्रवाल, संस्कार भारती पिं चिं समितीचे सचिव श्री. हर्षद कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्ते श्री. आनंद पानसे, रोटरी क्लब चे पी पी रो. प्रदीप वाल्हेकर, आय पी पी रो. सोमनाथ हरपुडे, रो. प्रणाली हरपुडे, रो. वसंत ढवळे, तसेच रोटरी परिवारातील अननस कु. सूयोग वाल्हेकर. कु. तन्मय वाल्हेकर, कु. रसिक वाल्हेकर, कु सुदिप्ता हरपुडे, कु. स्वराज हरपुडे,कु.विश्वेश खोले आदी उपस्थित होते
या उपक्रमाला मदत करण्याचे आवाहन रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी आणि सहगामी फाऊंडेशन कडून करण्यात आले होते.

या आवाहनाला प्रतिसाद देत रुपये ५००/- पासून अगदी ११०००/- पर्यंत देणगी स्वरूपात मदत मिळाली यामध्ये प्रामुख्याने रो. चंद्रकांत पाटील, रो. डॉ. मोहन पवार, रो. रोहन वाल्हेकर, रो. वसंत ढवळे, रो. स्वाती प्रदीप वाल्हेकर, रो. स्वाती सुनील वाल्हेकर, रो. प्रणाली हारपुडे यांची रोख स्वरूपात मोठी मदत मिळाली तसेच रोटरी व्यतिरिक्त जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. आनंद पानसे,संस्कार भारती चे संघटक सुहास जोशी

अंघोळीच्या गोळीचे  तनय पाटेकर, निसर्गदूत परिसर चे शरद सोनावणे, सखी फूड्स च्या संस्थापिका अश्विनी खोले, द्रोणाचार्य अकादमीचे जयंत सावंत, आमचे स्नेही हरीश मानकर, अनुराधा कदम अगदी अनामिक म्ह्णून ५०००/- पर्यंत देखील मदत दिली गेली, समाजामध्ये आपल्याकडे जास्तीचे जे आहे त्यातला थोडा वाटा या वंचित मुलांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी मोठ्या मनाने मदत देणाऱ्या सर्व दात्यांना मनपूर्वक आभार आणि आपल्या दातृत्वाला सलाम करण्यात आला.

दुसऱ्या टप्प्यात शहरातील फुटपाथ आणि उघड्यावर झोपणाऱ्या नागरिकांसाठी ब्लॅंकेट वितरण होणार आहे, या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी झटलेल्या सर्व स्वयंसेवकांचे यावेळी मनपूर्वक आभार मानण्यात आले. यावेळी मान्यवरांचे स्वागत रोटरी क्लबचे अध्यक्ष श्री. सचिन काळभोर यांनी केले, प्रास्ताविक प्राजक्ता रुद्रवार व आभार क्लबचे सचिव सचिन खोले यांनी मानले .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

17 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!