Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड महानगरपालिका ठरणार बालवाडी स्तरावरील दिव्यांग बालकांच्यावर लवकर निदान व उपचार करणारी राज्यातील पहिली महानगरपालिका!

महाराष्ट्र 14 न्यूज : बालवाडी स्तरावर दिव्यांग मुलांसाठी लवकर निदान व लवकर उपचार प्रकल्प राबविणारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका राज्यातील पहिली ठरली आहे असे मत महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी व्यक्त केले . पिंपरी चिंचवड महानगरपालिका व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र , पुणे . यांच्या संयुक्त विद्यमाने बालवाडी स्तरावर दिव्यांग मुलांचे लवकर निदान व उपचाराचे महत्त्व आणि बालवाडी ताईची भूमिका त्यांची कार्यपध्दती या विषयावर बालवाडी ताईसाठी कार्यशाळेचे आयोजन दि .१० / ०२ / २०२१ रोजी आचार्य आत्रे रंगमंदिर , संत तुकाराम नगर , पिंपरी , पुणे येथे करण्यात आले होते . या प्रसंगी त्या बोलत होत्या .

या वेळी व्यासपीठावर आयुक्त श्रावण हर्डीकर , पक्षनेते नामदेव ढाके तज्ञ सल्लागार समीर घोष , उप आयुक्त अजय चारठाणकर , जिल्हा समाज कल्याण अधिकारी प्रविण कार्गांतीवर , सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे आदी उपस्थित होते . विषय तज्ञ म्हणून डॉ. कल्याणी मांडके यांनी सदरील प्रकल्प केरळ व तमिळनाडू या सारख्या राज्यांनी यापूर्वीच सुरू केला असून महाराष्ट्रामध्ये पहिलीच महानगरपालिका असल्याने अभिनंदन करायला हवे असे सांगितले . यावेळी त्यांनी दिव्यांग बालक व त्यांच्या विकासात्मक प्रक्रियेत बालवाडी ताईची भूमिका या विषयावर प्रकाश टाकला .

Google Ad

आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी समाज कल्याण विकास आदी शब्दांच्या पलीकडे जाऊन न्याय भूमिकेतून दिव्यांगांसाठी कार्य करावे असे मत व्यक्त केले . या वेळी विषय तज्ञ शालिनी सिंग यांनी बालवाडी स्तरावरील अंमलबजावणी प्रक्रिया विषद केली त्यांना मनीषा परब यांना सहकार्य केले . दिव्यांग सल्लागार समीर घोष यांनी बालवाडी स्तरावर लवकर निदान व लवकर उपचार हा प्रकल्प राबवून आपले वेगळे वैशिष्ठ महापालिका निर्माण करत असल्याचे सांगितले . पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले , नाविन्यपूर्व व लोकहिताचे प्रकल्प राबविण्यामध्ये पिंपरी चिंचवड महापालिका अग्रेसर आहे . दिव्यांगांसाठी व त्यांच्या सक्षमीकरणासाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणारी राज्यातील ही पहिलीच महानगरपालिका असल्याचे मत व्यक्त केले .

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्राचे प्रकल्प संचालक विजय कान्हेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांनी केले . या प्रसंगी समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले , प्रहार संघटनेचे दत्ता भोसले , राजेंद्र वाघचौरे , मनिता पाटील , भाग्यश्री मोरे , रविंद्र झेंडे आदी मान्यवर उपस्थित होते . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीमती . अनिता मालपाठक , श्री.अशोक सोळंके , श्रीमती.जोशी इ . परिश्रम घेतले यावेळी मोठया संख्येने बालवाडी ताई उपस्थित होत्या .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

9 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!