Google Ad
Editor Choice Maharashtra crimes

Pune : गुन्हयात फरारी असणारे व येरवडा जेल येथे फटाके वाजवुन वाढदिवस साजरा करणारे सराईत गुन्हेगारांना केले जेरबंद!

महाराष्ट्र 14 न्यूज : तपास करत येरवडा पोलीस स्टेशन यांना गुन्हयामध्ये पाहिजे असलेला आरोपी प्रज्वल मधुकर बाराते ऊर्फ चोर पंजा वय २० वर्षे रा . नवी खडकी , येरवडा , पुणे व त्याचा विधी संघर्षित साथीदार यांनी दि . २६/०१/२०२१ रोजी शंकर मंदिरा समोर , भाजी मार्केट , चित्रा चौक , येरवडा , पुणे येथे त्यांचे इतर साथीदारांसह बेकायदेशीर जमाव जमवुन , हातात कोयते घेऊन परिसरात दहशत निर्माण करुन यातील फिर्यादी यांना जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केले होते .

त्याबाबत येरवडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असून स्थानिक पोलीस त्यांचा शोध घेत होते . सदर गुन्हयात फरार असतानाचे काळातच त्यांनी येरवडा कारागृहाचे परिसरात आकाश कंचिले याचा वाढदिवस फटाके वाजवून साजरा केला होता . सदर बाबत येरवडा पोलीस स्टेशन येथे स्वतंत्र गुन्हा दाखल आहे . सदर दोन्ही गुन्हयांचा युनिट ४ गुन्हे शाखा पुणे हे समांतर असताना , युनिट ४ गुन्हे शाखेकडील पो.हवा . ८७३ नागेश कुंवर व पो.अंमलदार ८२ ९ ३ रमेश राठोड यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली .

Google Ad

या गुन्ह्यात पाहिजे होते ते आरोपी हे काळेवाडी स्मशान भुमी येथे येणार असल्याची अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने मा . पोलीस निरीक्षक युनिट ४ गुन्हे शाखा पुणे यांनी सदर आरोपींच्या शोधाकरिता योग्य त्या सूचना देऊन टीम तयार केली . त्यानुसार काळेवाडी स्मशान भुमी येथे युनिट ४ कडील अधिकारी व अंमलदार यांनी सापळा रचून त्यांना ताब्यात घेऊन येरवडा पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या दोन गुन्हयांचे पुढील कायदेशिर कारवाई करिता येरवडा पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे .

सदरची कारवाई मा . अपर पोलीस आयुक्त , गुन्हे श्री अशोक मोराळे , मा पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री बच्चन सिंह , सहा पोलीस आयुक्त गुन्हे -२ श्री लक्ष्मण बोराटे , पोलीस निरीक्षक श्री रजनिश निर्मल यांचे मार्गदर्शना खाली सहा . पोलीस निरीक्षक संदिप जमदाडे , पोलीस उपनिरीक्षक शशिकांत शिंदे, सपोफौ शंकर पाटील , पोलीस अंमलदार रुपेश वाघमारे , नागेश कुंवर , राजस शेख , दिपक भुजबळ , विशाल शिर्के , प्रविण कराळे , रमेश राठोड, दत्ता फुलसुंदर व अक्षता विसापुरे यांनी केली आहे .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

53 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!