Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड शहराच्या शिरपेचात मनाचा तुरा … नवी सांगवीतील हे, पती-पत्नी ठरले ‘गुणवंत कामगार भूषण’ पुरस्काराचे पहिले मानकरी!

महाराष्ट्र 14 न्यूज : प्रर्दिघ वर्षानंतर प्रलंबित कामगार कल्याण मंडळाच्या वतीने मानाचा “गुणवंत कामगार भुषण” पुरस्काराचे मुबंईत दिमाखात वितरण. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने गेल्या पाच वर्षापासूनचे रखडलेले सन 2015 व 2017 चे “गुणवंत कामगार “पुरस्काराचे मुबंईत दिमाखात पार पडले.

सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रिडा,आदी क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या गुणवंत कामगारांना रोख रक्कम 25000 हजार रुपये, कामगार भुषण कामगारांना 50,000 रुपये,सन्मानपत्र, ,पदक,ट्राफी, महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री,दिलीप वळसे पाटील व कामगार राज्य मंत्री आ.बच्चु कडु,कल्याण आयुक्त रविराज इळवे,  याच्या शुभ हस्ते गुणवंत कामगार व कामगार भुषण पुरस्कार वितरण मुंबईतील,गिरणी कामगार भवन येथे देण्यातआला.

Google Ad

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रधान सचिव (कामगार)श्रीमती विनीता वेद॒-सिंघल,तर डॉ महेंद्र कल्याणकर कामगार आयुक्त,कल्याण आयुक्त रविराज ईळवे, सहायक कल्याण आयुक्त पुणे समाधान भोसले साहेब, गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या अध्यक्षा भारतीताई चव्हाण,श्रमिक कामगार आघाडीचे अध्यक्ष,यशवंदभाऊ भोसले,गुणवत कामगार असोसिएशन चे अध्यक्ष सुरेश केसकर चव्हाण यांच्या प्रमुख. उपस्थितीत गुणगौरव सोहळा संपन्न झाला.

यामध्ये महाराष्ट्रातील एकुण 104 गुणवंत  कामगारांचा तर 2 कामगार भुषण  पुरस्काराचा समावेश होता.सन 2015 मध्ये कामगार भुषण म्हणून औरंगाबादचे महेश सेवलीकर तर पिंपरी चिंचवड व पुणे जिल्हातुन एकुण 11 कामगारांची निवड करण्यात आली होती. यामध्ये महेश मेस्त्री, हनुमंत माळी (दोघेही टाटा मोटर्स) किशोर शिंदे, श्रीकांत भुते (एस.के.एफ). विकास कोरे (किर्लोस्कर ऑईल इंजिन) कृष्णा ढोकणे,(हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळ) दत्तात्रय येळवंडे (स्पँको टेक्नॉलॉजी )रवींद्र कुलकर्णी (जी.के.एन .सिंटर मेटल) संजय साळुंखे (लोकमान्य हॉस्पिटल, निगडी) सुनील कुटे (महीद्रा सीआयई,) बाळकृष्ण गोपाळे (वनाझ इंजिनीरिंग) याना देण्यात आला.

सन.2017 ला कामगार भुषण म्हणून सांगलीचे विजय पिसे याना कामगार भुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर पिंपरी चिंचवड व परीसरातील 6 गुणवंत कामगारांची निवड झाली होती. यामध्ये  सौ संगिता जोगदंड ( धर्मवीर संभाजी को-आँ बँक लि.पण सध्या त्या नामको बँक,शाखा लांडेवाडी येथे व्यवस्थापिका म्हणून कार्यरत आहेत. शिवराम गवस (सिमंड मार्शल लि) इस्माईल नासरुद्दीन मुल्ला,दत्तात्रय प्रल्हाद अवसरकर (दोघेही टाटा मोटर्स) शंकर नाणेकर ( एम.पी .एंटरप्राइज असोसीएट प्रा.लि ) संदिप पानसरे (महीद्रा सीआयई,उर्से)  ईत्यादी गुणवंत कामगारांचा राज्याचे , कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, कामगार राज्यमंत्री बच्चू कडू,कल्याण आयुक्त रविराज ईळवे ,सहायक आयुक्त पुणे समाधान भोसले याच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

रखडलेला पुरस्कार मिळाल्याने कामगार आनंदी होते तर काही कामगार पाच वर्षापूर्वीच सेवानिवृत्त झाले होते. त्याच्याही मनात पुरस्कार मिळेल की नाही शकांच होती. महाआघाडीचा सरकारने त्यांना अचानक सुखद धक्का दिल्याने कामगार वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. नारायण मेघाजी लोखंडे या गिरणी कामगार चळवळीचे नेतृत्व करणाऱ्या ,कामाचे तास 12  व 14 तासावुन 8 तास काम व रविवारची सुट्टी करणाऱ्या महान  सत्यशोधक समाजाचे नेतृत्व करणाऱ्या रावबहादुर मेघाजी लोखंडे यांच्या पुण्यतिथी निमित्त पुरस्कार मिळाला याचा आनंद आमच्या गगनात मावेनासा झाल्याचे संगिता जोगदंड व अवसरकर दत्तात्रय, मुल्ला ईसमाइल यांनी व्यक्त केले. हनुमंत माळी म्हणाले की शासनाने कामगार भुषण महाराष्ट्रातुन एकच दिला जातो .राज्यातील प्रत्येक विभागातुन एक द्यावा गुणवंत कामगार पुरस्कार मिळाल्यानंतर दहा वर्षांनी नामांकन भरावे लागते .व्यक्त केले.तो कार्यकाळ पाच वर्षाचा करावा असे मत

पिंपरी चिंचवड शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा.
यावर्षीचे विषेश म्हणजे पिंपरी चिंचवड व पुणेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारे पती -पत्नी म्हणून “गुणवंत कामगार” पुरस्कार मिळणारे पिंपरी चिंचवड व पुणेतील जिल्ह्यातील पहीले तर व महाराष्ट्रातील दुसरे दांपत्य सौ संगिता जोगदंड व त्यांचे पती श्रीकांत(आण्णा) जोगदंड हे ठरले आहेत. श्रीकांत(आण्णा)जोगदंड यांना 2014 चे गुणवंत कामगार पुरस्कारार्थी आहेत. दोघेही सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहेत त्यामुळे त्या दाघांचेही पिंपरी चिंचवड शहरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

71 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!