Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

एन जी एनव्हायरो इन्फ्रा प्रोजेक्ट या कचरावेचक कंपनीस काळ्या यादीत टाकण्याची पिंपरी चिंचवडच्या महापौरांनी केली मागणी!

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातंर्गत कचरा गोळा करण्याचे कंत्राट देण्यात आले आहे . परंतु ०८ फेब्रुवारी २०२१ रोजी मे . एन जी एनव्हायरो या कंपनीचे कर्मचारी कचऱ्याचे वजन वाढविण्यासाठी वाकड , कस्पटेवस्ती या ठिकाणी हॉटेल व वाईन शॉप आवारातील खाजगी कचरा उचलत असल्याचे निदर्शनास आले आहे .

काय आहे प्रकरण?

Google Ad

या प्रकरणावरुन सदर ठेकेदाराने कामाच्या अटी व शर्तीचा भंग करुन महापालिकेचे आर्थिक नुकसान करत असल्याचे तसेच अशाप्रकारे जादा बजन वाढवून त्याची बीले महापालिकेस देवुन महापालिकेकडुन पैसे उकळण्याचा प्रकार झाल्याचे प्रथमदर्शनी दिसुन येत आहे . या ठेकेदाराने दरमहाचे बिलानुसार अशाच पद्धतीने राडा – रोडा , जमिनीवरील माती , दगड – धोंडे टाकुन वजन वाढवुन बिले घेतली असल्याचीही शक्यता नाकारता येत नाही .

ही बाब गंभीर स्वरुपाची असुन सदर ठेकेदारावर कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याची मागणी पिंपरी चिंचवड च्या महापौर माई ढोरे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करुन मे . एनजी एनव्हायरो या ठेकेदार कंपनीला काळ्या यादीत टाकणेकामी कारवाई करावी असेही या निवेदनात म्हटले आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

5 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!