Google Ad
Editor Choice Pune

Pune : हरणाच्या दुर्मिळ शिंगाची विक्री करण्याचे प्रयत्नात असणारा युवक जेरबंद … दत्तवाडी पोलीसांची पाचगाव पर्वती – तळजाई वन विहारात कारवाई!

महाराष्ट्र 14 न्यूज, ( दि .०८ फेब्रुवारी २०२१ ) : रोजी दत्तवाडी पोलीस ठाणेचे तपास पथकातील पोलीस उपनिरिक्षक स्वप्नील लोहार व त्यांचा स्टाफ असे दत्तवाडी पोलीस ठाणे हद्दीमध्ये कायदा व सुव्यवस्था राखणेकामी पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार कुंदन शिंदे , अमित सुर्वे व शरद राऊत यांना त्यांचे खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की , “ एक इसम पाचगाव पर्वती / तळजाई वनविहाराचे अतर्गत भागात येथे येणार असुन त्याचेकडे वन्य प्राण्यांचे दुर्मिळ शिंग आहे .

Google Ad

ते विक्री करण्याचे प्रयत्नात आहे . ” अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदरची बातमी पो.उप.निरी.लोहार यांनी मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक सो व पोलीस निरिक्षक सो । ( गुन्हे ) यांना कळविली असता त्यांनी सदर ठिकाणी जावुन सापळा लावुन सदर इसमास ताब्यात घेवुन योग्य ती कायदेशीर कारवाई करणेबाबातचे आदेश दिल्याने लागलीच दत्तवाडी तपास पथकाने सापळा रचुन वर नमुद ठिकाणी वन विभागाचे वन रक्षक नामे मधुकर भास्कर गोडगे यांना सोबत घेवुन चंद्र दानसिंग आवजी , वय -१९ वर्षे , रा.अण्णाभाऊ साठे वसाहत , सहकारनगर नंबर २ , पुणे यास जागीच जेरबंद केले .

त्याचेकडुन एक दुर्मिळ अमुल्य किमंतीचे सांबर जातीचे हरीणचे शिंग जप्त करण्यात आली असुन त्याबाबत दत्तवाडी पो . स्टे . येथे गु.र.नं .४३ / २०२१ , भारतीय वन्य जीव संरक्षण अधिनियम १ ९ ७२ चे कलम २ ( ३१ ) , ३ ९ , ४ ९ , ५०,५१ ( १ ) , भारतीय वन अधिनियम कायदा १ ९ २७ चे कलम २,४१,४२,५२ प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आला आहे . सदर आरोपीने सांबराचे शिंग कोठुन व कशाप्रकारे मिळवले तसेच त्याचा वापर व विक्री कोणाला करणार होता . याबाबत दत्तवाडी पोलीस ठाणे येथे सखोल तपास सुरु आहे . सदर बाबत दत्तवाडी पोलीस ठाणेचे पोलीस अमंलदार अमित सुर्वे यांनी फिर्याद दिली आहे .

दाखल गुन्हयांचा पुढील तपास पोलीस हवालदार राजु जाधव दत्तवाडी पोलीस ठाणे पुणे हे करीत आहेत . सदरची कारवाई ही मा.अपर पोलीस आयुक्त , पश्चिम प्रादेशीक विभाग , मा.संजय शिंदे , पोलीस उप – आयुक्त साो परि . ३ मा.पौर्णिमा गायकवाड , सहा.पोलीस आयुक्त सिंहगड विभाग पोमाजी राठोड , वरीष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर व पोलीस निरिक्षक , ( गुन्हे ) , विजय खोमणे यांचे मार्गदर्शनानुसार तपास पथकातील पोलीस उप – निरीक्षक स्वप्नील लोहार , पो . हवा . कुंदन शिंदे , सुधीर घोटकुले , राजु जाधव , पो . अं . अमित सुर्वे , शरद राऊत , महेश गाढवे , नवनाथ भोसले , अक्षयकुमार वाबळे , विष्णु सुतार , शिवाजी क्षीरसागर राहुल ओलेकर , प्रमोद भोसले व सागर सुतकर यांनी केली आहे .

 

Tags
Google Ad

About the author

Maharashtra14 News

7 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!