Google Ad
Editor Choice Maharashtra

Mumbai : कडकनाथ कोंबड्या मागे लागल्या की खोतांना कळेल … शरद पवारांना डिवचल्यानंतर मुश्रीफांचं उत्तर!

महाराष्ट्र 14 न्यूज : तुम्ही कधी क्रिकेट खेळला होता, तरीही तुम्ही क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष होताच ना. मग सचिन तेंडुलकरने शेतकरी आंदोलनावर प्रतिक्रिया व्यक्त केली तर बिघडले कुठे? असा सवाल रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना केला होता. खोत यांच्या या टीकेचा कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांच्या खास स्टाईलने समाचार घेतला आहे. कडकनाथ कोंबड्या मागे लागल्यावर खोतांना कळेल काय ते, असा पलटवार हसन मुश्रीफ यांनी केला आहे.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना हसन मुश्रीफ यांनी हा टोला लगावला आहे. शेतकऱ्यांचे आंदोलन मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. त्यावर सेलिब्रिटी ट्विट करत आहेत. शरद पवारांनी वडिलकीच्या नात्याने सचिन तेंडुलकरला सल्ला दिला. शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत भाजपमध्ये गेले आहेत. पवारांवर टीका करताना त्यांना लाज वाटायला हवी होती. पवार साहेब, हे खेळावर प्रेम करणारे आणि खेळाची आवड असलेली व्यक्ती आहे. त्यांनी आयपीएल सुरू करून ग्रामीण भागातील टॅलेंट शोधून काढण्याचं काम केलं. क्रिकेटपटूंना निवृत्तीनंतर मानधन मिळवण्यासाठी योजना आणली. खोतांनी तर कडकनाथ कोंबड्यांचा व्यवसाय सुरू केला होता. या व्यवसायातून त्यांनी अनेक बेरोजगारांनना फसवले. त्यांच्या चिरंजीवावर पोलीस केस आहे. कडकनाथ कोंबड्या मागे लागल्या की कळेल खोतांना, असा इशारा मुश्रीफ यांनी दिला.

Google Ad

काय म्हणाले होते खोत?

सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर टीका केली होती. ज्यांना ज्या क्षेत्रातल कळत त्यातल त्यांनी बोलावं, असं विधान शरद पवारांनी केलं. हे ऐकून थोडा वेळ हसू आलं, असं खोत म्हणाले होते. शरद पवार कधी क्रिकेट खेळले होते का? सध्या ते कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आहेत त्यांनी कधी कुस्ती खेळली होती?, असा सवालही त्यांनी केला होता. अनेक विषय असतात अनेकांना वाटत मला सोडून दुसऱ्याला कळत नाही अशी कमी लेखण्याची पध्दत काही लोकांनी राज्यात लावली आहे. हे योग्य नसून नवीन नेतृत्वाला हानीकारक असल्याचंही ते म्हणाले होते.

पॉपस्टार रिहानानं कायतरी ट्विट केलं, तिला भारतातील शेतकऱ्यांचा कळवळा आला. ती ज्या खंडात राहते तिथ काही लोक अर्ध पोटी राहतात त्याबद्दलही कधी ट्विट करायला पाहिजे होते, असं खोत म्हणाले होते.

शरद पवार सचिनच्या ट्विटवर काय म्हणाले?

सचिन तेंडुलकरने शेतकरी आंदोलनावर काही भूमिका घेतली असली, तरी सामान्य लोकांमध्ये त्याची प्रतिक्रिया उमटली आहे. त्यांनी वेगळ्या क्षेत्राबद्दल बोलायचं असेल तेव्हा काळजी घेतली पाहिजे, हा माझा सचिनला सल्ला आहे, असं शरद पवार म्हणाले होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

9 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!