Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड कोरोना अपडेट्स – मंगळवार, २० ऑक्टोबर २०२०

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज मंगळवार ( दि. २० ऑक्टोबर २०२० ) रोजी २०१ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला असून पिंपरी चिंचवड शहरातील १९३ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला असून शहारा बाहेरील ८ रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले असून या सर्वांवर महानगरपालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर ३३४ रुग्ण हे कोरोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

आज पिंपरी चिंचवड हद्दीमधील मृत झालेले रुग्ण हे ०४ पुरुष – च – होली ( ७ ९ वर्षे ) दापोडी ( ५७ वर्षे ) चिंचवड ( ५५ वर्षे ) दिघी ( ५६ वर्षे ) ०३ स्त्री- भोसरी ( ६० वर्षे ) चिंचवड ( ९ ४ वर्षे , ६० वर्षे ) येथील रहिवासी आहेत .

Google Ad

पिंपरी चिंचवड हद्दीबहेरील रहीवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे ०४ पुरुष – सातारा ( ८२ वर्षे ) चाकण ( ४ ९ वर्षे , ५८ वर्षे ) शिवणे ( ४३ वर्षे ) येथील रहिवासी आहेत .

माझे कुटुंब माझी जबाबदारी सर्वेक्षण मोहिम ( दुसरा टप्पा ) अंतर्गत आज अखेर १३१४ पथकांव्दारे १२ ९ २८४० लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात आले असून त्यामध्ये २८५८ व्यक्तींच्या घशातील नमुन्यांची तपासणी केली असता १०३ व्यक्ती कोविड पॉझिटीव्ह आढळून आलेल्या आहेत .

पावसाळा असल्यामुळे वैद्यकिय विभाग , पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की , अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये . तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता घ्यावी यासाठी किमान एक तरी अतिरिक्त ( Extra ) मास्क जवळ बाळगाव .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

2 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!