Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड कोरोना अपडेट्स … मंगळवार, ०५ जानेवारी २०२१

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज मंगळवार ( दि. ५, जानेवारी २०२१ ) रोजी महानगरपालिका रुग्णालयात १४१ बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत, यातील पिंपरी चिंचवड शहरातील १४० रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह तर शहराबाहेरील ०१ रुग्णांचा अहवालात कोरोना पॉझीटीव्ह आला या सर्वांवर पिंपरी चिंचवड मनपा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर ७१ रुग्ण हे कोरोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहेत.

पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे ०२ स्त्री – पिंपरी ( ७३ वर्षे ) , रहाटणी ( ५८ वर्षे ) येथील रहिवासी आहेत . पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे ०१ पुरुष – जुन्नर ( ७५ वर्षे ) येथील रहिवासी आहेत . इंग्लंडहून मुंबईत उतरलेल्या पिंपरी चिंचवड शहरातील २६८ प्रवाशांचा शोध घेण्यात आला आहे . त्यापैकी ७ प्रवाशांचे नमुने NIV पुणे येथे UK स्ट्रेन करीता जिनोम सिक्वेसिंगसाठी पाठविले असता ०२ अहवाल नकारात्मक व ०५ अहवाल प्रलंबित आहेत .

Google Ad

पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की , अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये . तसेच घराबाहेर पडताना मास्क चा वापर करावा.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

11 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!