Google Ad
Editor Choice Pune

Pune : ईडीच्या अधिकाऱ्यांचा अ‌ॅड. असीम सरोदेंना फोन … साडे तीनला ईडीची टीम सरोदेंच्या कार्यालयात एकनाथ खडसे’ प्रकरणाची चौकशी करणार!

महाराष्ट्र 14 न्यूज : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंच्या  केस प्रकरणी चौकशी करण्यासाठी ईडीचे अधिकाऱ्यांनी अ‌ॅड. असीम सरोदे यांना फोन केल्याची माहिती मिळत आहे. ईडीचे अधिकारी थोड्याच वेळात सरोदे यांच्या कार्यालयात पोहोचणार आहेत. एकनाथ खडसेंच्या केससंदर्भातील कागदपत्रांचा तपास करण्यासाठी ईडीकडून फोन आल्याची माहिती आहे.

एकनाथ खडसेंच्या केसमध्ये अ‌ॅड. असीम सरोदे हे खडसेंचे वकील आहेत. त्यासंबंधी माहिती घेण्यासाडी ईडीचे अधिकारी सरोदे यांच्या कार्यालयात जाऊन माहिती घेणार आहे. ईडीची टीम सरोदेंच्या कार्यालयात 3.30 वाजता पोहोचणार आहे. अ‌ॅड. असीम सरोदे दोन हजार पानांची माहिती ईडीकडे देण्याची शक्यता आहे. एकनाथ खडसे यांना ईडीकडून भोसरी जमीन प्रकरणी 30 डिसेंबरला ईडीसमोर हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले होते. मात्र, एकनाथ खडसेंना कोरोना झाल्यामुळे ते ईडीसमोर हजर राहिले नव्हते.

Google Ad
Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!