Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमुळे आर्थिक दुर्बल घटकातील सर्वसामान्य जनतेच्या घराचे स्वप्न साकार … सहाय्याक आयुक्त ‘राजेश आगळे’ यांनी दिली प्रकल्पाची माहिती!

महाराष्ट्र 14 न्यूज, ( दि . ५ जानेवारी २०२१) : सध्याच्या परिस्थितीत घर घेणे आवाक्याबाहेरचे आहे . आपल्या हक्काचे घर असावे अशी सर्वसामान्य जनतेची आशा असते . त्याचे हे स्वप्र प्रत्यक्षात उतरविण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने घरकुल योजना राबविण्याचा उपक्रम सुरु केला . या उपक्रमातून घर मिळाल्यानंतर लाभार्थ्यांचे जीवनमान निश्चितपणे उंचावले जाणार आहे असे मत महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी व्यक्त केले .

केंद्र आणि राज्य शासनाच्या सहाय्याने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने चिखलीतील प्राधिकरण सेक्टर १७ आणि १९ येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी घरकुल योजना राबविण्यात येत आहे . या घरकुल प्रताल्पातील ३ सोमायट्यांच्या इमारती मधील एकूण १२६ लाभार्थ्यांच्या सदनिकाची संगणकीकृत सदनिका वाटप आज महापौर माई ढोरे यांच्या हस्ते कारण्यात आली . त्यावेळी लाभार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.चिंचवड येथील अँटो क्लस्टर मध्ये झालेल्या या कार्यक्रमास सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके , शहर सुधारणा समिती सभापती सोनाली गव्हाणे , नगरसदस्या अनुराधा गोरखे सुनिता तापकीर , शारदा सोनवणे , झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाचे सहाय्यक आयुक्त राजेश आगळे , प्रशासन अधिकारी श्रीकांत कोळप , कार्यालयीन अधिक्षक संभाजी घुले , मुख्य लिपिक सुनिल माने यांच्यासह या विभागातील राजेश जाधव , सुजाता कानडे , दिपक पवार , संदिप भागवत , योगिता जाधव तसेच समन्वयक दर्शन शिरुडे आदीसह लाभार्थी उपस्थित होते .

Google Ad

महापौर माई ढोरे म्हणाल्या, पिंपरी चिंचवड शहराला झोपडपट्टी विरहीत शहर करून प्रत्येकाला स्वतःचे हक्काचे घर देण्याचा संकल्प केला आहे . यासाठी घरकुल योजनाचा सुरू करण्यात आली असून या योजनांचा लाभ अनेकांना होत आहे . या योजनेतील लाभार्थ्यांना सदनिकांचे वाटप पारदर्शक पध्दतीने करण्यासाठी सर्वांच्या उपस्थितीत संगणकीय सोडत काढण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले . मिळालेले घर प्रत्येकाने व्यवस्थित सांभाळले पाहिजे . मिळालेले घर आपल्याला नक्कीच सकारात्मक उर्जा आणि समाधान देईल . मात्र हे घर कोणीही विकू अथवा भाड्याने देऊ नका . महानगरपालिकेचे यावर सतत लक्ष असेल . असे करणा – यांवर कारवाई केल्याशिवाय पर्याय राहणार नाही , असेही महापौरांनी स्पष्ट केले . कोरोना काळात सर्वांनी नियमांचे पालन करावे . आपल्या शहराला अधिक चांगले बनविण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे असे आवाहनही महापौर माई ढोरे यांनी यावेळी केले .

पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले , शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी तसेच विविध प्रकल्पांमुळे बाधित होणा – यांसाठी महापालिकेने घरे उपलब्ध करून देण्याचे काम हाती घेतले आहे . या योजनाना अधिक गती देण्याचा प्रयत्न केला जाईल , लाभार्थ्यांना विविध योजनांच्या माध्यमातून घरे उपलब्ध करून देण्यासाठी आणि प्रत्येकाला घर मिळेल यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील राहू असेही ढाके म्हणाले , सोनाली गव्हाणे यांनी देखील यावेळी मनोगत व्यक्त केले .

यावेळी नियोजित घरकुल सहकारी गृहरचना सोसायटी क्रमांक -१३७ इमारत क्रमांक सी- -२४ चे प्रतिनिधी अर्जुन शिंदे , सोसायटी क्रमांक- १३८ इमारत क्रमांक -१३ चे प्रतिनिधी बाबाजी वाळुंज, सोसायटी क्रमांक १३९ इमारत क्रमांक डी -३० चे प्रतिनिधी अशोक कोसुळे यांना संगणकीय सदनिका वाटप सोडतीची यादी महापौराच्या हस्ते सुपुर्द करण्यात आली . सहाय्यक आयुक्त ‘राजेश आगळे’ यांनी प्रकल्पाची माहिती दिली . तसेच घराचा वापर , येणारे देयके आणि बँकेचे हप्ते वेळेवर भरण्याबाबत मार्गदर्शन केले . माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

131 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!