Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

BIG BREAKING : पिंपरी चिंचवडची धाकधूक वाढली … राज्यातील नव्या कोरोना स्ट्रेनचे तिन्ही प्रवासी पिंपरी चिंचवडचे!

महाराष्ट्र 14 न्यूज : कोरोनाच्या सुरुवातीच्या टप्प्यात महाराष्ट्रात सर्वात आधी आणि जास्त फटका पुण्याला बसला होता. आता त्याचीच पुनरावृत्ती होते की काय अशी भीती व्यक्त केली जात आहे. कारण ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे आणखी 3 रुग्ण पुण्यात सापडले आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. याबाबत स्वतः राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.

Google Ad

राजेश टोपे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं, “ब्रिटनमधील नवीन कोरोना स्ट्रेनचे राज्यात आणखी 3 प्रवासी आढळले आहेत. तिन्ही प्रवासी पिंपरी चिंचवडचे आहेत. यासह आता नव्या कोरोना स्ट्रेनचे राज्यात एकूण 11 प्रवासी झाले आहेत. राज्यात आज 3729 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली. आज नवीन 3350 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले. एकूण 18 लाख 56 हजार 109 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले. राज्यात एकूण 51 हजार 111 सक्रीय कोरोना रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 94.78 टक्के झाले आहे.”

“केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार उद्या (8 जानेवारी) महाराष्ट्रातील 30 जिल्हे आणि 25 महानगरपालिका क्षेत्रांमध्ये कोरोना लसीकरणासाठी ड्राय रन मोहिम राबविण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यांमध्ये 3 आरोग्य संस्था आणि प्रत्येक महानगरपालिकेमध्ये 1 आरोग्य संस्था याठिकाणी हा ड्राय रन घेण्यात येईल,” असंही राजेश टोपे यांनी नमूद केलं.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

53 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!