Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड कोरोना अपडेट्स … गुरुवार , ३१ डिसेंबर २०२०

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज गुरुवार ( दि. ३१, डिसेंबर २०२० ) रोजी पिंपरी चिंचवड शहरातील १२५ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला असून या सर्वांवर पिंपरी चिंचवड मनपा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर ६० रुग्ण हे कोरोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहेत.

पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे ०१ पुरुष – आकुर्डी ( ६५ वर्षे ) ०१ स्त्री – चिंचवड ( ८२ वर्षे ) येथील रहिवासी आहेत . पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे ०१ पुरुष – आंबेगाव ( ४५ वर्षे ) , ०१ स्त्री – निमगाव ( ६३ वर्षे ) येथील रहिवासी आहेत .

Google Ad

इंग्लंडहून मुंबईत उतरलेल्या पिंपरी चिंचवड शहरातील २६८ प्रवाशांचा शोध घेण्यात आला आहे . त्यापैकी १४ प्रवाशी भारतात परतलेले नाहीत , ५० प्रवाशी बाहेरगावी गेलेले आहेत व १६ प्रवाशांचा २८ दिवसांचा कालावधी पुर्ण झालेला आहे . उर्वरीत १८८ प्रवाशांची चाचणी केली असून त्यापैकी १५ ९ नकारात्मक असून ६ अहवाल कोविड सकारात्मक आहे उर्वरित २३ अहवाल प्रलंबित आहेत .

पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की , अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये . तसेच घराबाहेर पडताना मास्क चा वापर करावा.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!