Google Ad
Editor Choice Pune

Pune : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी … PMPL ला ‘ ही ‘ कंपनी देणार 150 इलेक्ट्रिक बस

महाराष्ट्र 14 न्यूज : भारत सरकारच्या फेम -2 योजनेंतर्गत इलेक्ट्रिक बस उत्पादनात अग्रणी ऑलेक्ट्रा ग्रीनटेक आणि एव्ही ट्रान्स प्रायव्हेट लिमिटेड (EVEY) यांना पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (PMPL)150 इलेक्ट्रिक बस पुरवण्यासाठीची ऑर्डर मिळाली आहे. EVEY ट्रान्स या 150 इलेक्ट्रिक बसेस ऑलेक्ट्रा ग्रीनटेककडून खरेदी करेल, पुढच्या 12 महिन्यांच्या कालावधीत त्या वितरीत केल्या जातील. कराराच्या कालावधीत या बसेसची देखभाल देखील कंपनीकडून केली जाईल.

150 बसेस पुरवठ्याच्या या नवीन आदेशासह, ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड (OGL)ला आता एकूण 900 इलेक्ट्रिक बसेसचा पुरवठा करायचा आहे. “पुणे महानगर परिवहन महामंडळ (PMPL) ने 12 मीटर लांबीच्या 150 इलेक्ट्रिक बसची मागणी आमच्याकडे केली आहे ही आनंदाची बाब आहे. ओजीएल / EVEY ने पुण्यात याआधीच दिलेल्या 150 बसेस रस्त्यावर सेवा बजाबत आहेत आणि या नव्या ऑर्डरमुळे इलेक्ट्रिक बसेसच्या ताफ्याचा आकार 300 पर्यंत जाईल जो देशातील सर्वाधिक आहेत. ओजीएल आणि ईव्हीवाय ट्रान्स या दोघांसाठीही हा अभिमानास्पद क्षण आहे, ”असे ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेडचे ​​सीईओ आणि सीएफओ शरत चंद्र यांनी सांगितले.

Google Ad

प्रवाशांना सुखसोयीसाठी या 12 मीटर लांबीच्या वातानुकूलित बसेसमध्ये इलेक्ट्रॉनिक्स नियंत्रित एअर सस्पेंशन आहे. बसण्यासाठी 33 आसने + व्हीलचेअर + चालक अशी सोय आहे. तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे व्हीलचेअर, आपत्कालीन बटन, मोबाइल चार्जिंगसाठी यूएसबी सॉकेट्स बसवण्यात आली आहेत. बसमध्ये बसवलेल्या लिथियम-आयन बॅटरीमुळे एका चार्जमध्ये जवळ जवळ 200 किमीपेक्षा अधिक अंतर ऑलेक्ट्रा कापू शकते. या अत्याधुनिक इलेक्ट्रिक बसमध्ये रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टम आहे. ज्यामुळे ब्रेक लावल्यावर तयार होणाऱ्या ऊर्जेचा विनियोग बसमध्ये केला जातो. हाय-पॉवर चार्जिंग सिस्टम बॅटरीला 2-5 तासांच्या दरम्यान पूर्ण रिचार्ज करते.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!