Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड कोरोना अपडेट्स … रविवार ,१० जानेवारी २०२१

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज रविवार ( दि. १०, जानेवारी २०२१ ) रोजी पिंपरी चिंचवड शहरातील १८३ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला असून या सर्वांवर पिंपरी चिंचवड मनपा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर १६३ रुग्ण हे कोरोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहेत.

पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे ०१ पुरुष – मारुंजी ( ६२ वर्षे ) व ०१ स्त्री – आळंदी ( ७४ वर्षे ) येथील रहिवासी आहेत.

Google Ad

इंग्लंडहून मुंबईत उतरलेल्या पिंपरी चिंचवड शहरातील २६८ प्रवाशांचा शोध घेण्यात आला आहे . त्यापैकी ७ प्रवाशांचे नमुने NIV पुणे येथे UK स्ट्रेन करीता जिनोम सिक्वेसिंगसाठी पाठविले असता ०३ अहवाल नकारात्मक आढळले असुन ०३ अहवाल UK स्ट्रेन B.१.१.७ करीता सकारात्मक असून तिघांची प्रकृती चांगली आहे व ०१ अहवाल प्रलंबित आहेत .

पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की , अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये . तसेच घराबाहेर पडताना मास्क चा वापर करावा.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!