Google Ad
Editor Choice Maharashtra

Mumbai : जाणून घ्या Z+, Y सुरक्षा व्यवस्था काय असते? कुणाला दिली जाते?

महाराष्ट्र 14 न्यूज : ठाकरे सरकारने राज्यातील महत्त्वाच्या व्यक्तींना देण्यात येणाऱ्या सुरक्षा व्यवस्थेत नुकताच मोठा बदल केला आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षा ताफ्यातील बुलेटप्रुफ गाडी काढून घेण्यात आली आहे. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची झेड (z) दर्जाची सुरक्षा काढून घेऊन त्यांना वाय (Y+) दर्जाची सुरक्षा दिली आहे.

या पार्श्वभूमीवर ही सुरक्षा प्रणाली नेमकी काय असते हे समजून घेऊया. देशासह राज्यात अनेक प्रकारच्या विशेष व्यक्ती आहेत. या व्यक्तींना देशासह राज्यामध्ये विशेष महत्त्व असते. त्यांना विशेष महत्त्व असल्यामुळे आकसापोटी किंवा शत्रूत्वाची भावना ठेवून त्यांच्यावर हल्ला होऊ शकतो. या शक्यतांचा विचार करुन सरकारतर्फे त्यांना वेगवेगळ्या प्रकारची सुरक्षा प्रदान करण्यात येते.

Google Ad

ही सुरक्षा व्यवस्था एकूण चार प्रकारची असून झेड प्लस (Z+), झेड (z), वाय (Y), एक्स (X) असे सुरक्षा व्यवस्थेचे प्रकार आहेत. या सर्वांपेक्षा उच्च समजली जाणारी SPG ( स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप) सुरक्षा व्यवस्था देशाचे पंतप्रधान, माजी पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबाला दिली जाते. गुप्तचर यंत्रणा, पोलीस यांनी दिलेल्या गुप्त माहितीनुसार देशातील तसेच राज्यातील महत्त्वाच्या व्यक्तींना सुरक्षा प्रदान केली जाते. एसपीजीसह इतर चार प्रकारच्या सुरक्षा व्यवस्था राष्ट्रपती, माजी राष्ट्रपती, पंतप्रधान, माजी पंतप्रधान, खासदार, आमदार, सेलिब्रिटी, बॉलिवूड सेलिब्रिटी, क्रिकेटर यांना दिली जाऊ शकते.

🔴झेड प्लस (Z+) सुरक्षा काय आहे?

ही एसपीजी (SPG) नंतर दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी सुरक्षा व्यवस्था आहे. यामध्ये महत्त्वाच्या व्यक्तीच्या सुरक्षेसाठी एकूण 55 सुरक्षा रक्षक तैनात करण्यात येतात. या 55 सुरक्षा रक्षकांपैकी 10 पेक्षा जास्त एनएसजी (NSG) कमांडो असतात. त्यासोबतच या ताफ्यात पोलीस अधिकारीसुद्धा असतात. आयटीबीपी (ITBP) आणि सीआरपीएफ (CRPF) चे जवानसुद्धा या प्रकारच्या सुरक्षा व्यवस्थेत तैनात केले जातात. झेड प्लस सुरक्षा व्यवस्थेत एस्कॉर्ट्स आणि वानहसुद्दा दिले जाते.

🔴झेड (Z) प्रकारची सुरक्षा व्यवस्था

या सुरक्षा व्यवस्थेत चार ते पाच एनएसजी कमांडो महत्त्वाच्या व्यक्तीचे रक्षण करतात. त्यांच्यासोबत एकूण 22 सुरक्षारक्षक या प्रकारच्या सुरक्षेत तैनात केले जातात. या प्रकारच्या सुरक्षेत दिल्ली पोलीस, आयटीबीपी आणि सीआरपीएफचे जवान या प्रकारच्या सुरक्षा व्यवस्थेत तैनात असतात. तसेच या ताफ्यात पोलीस अधिकारीसुद्दा असतात.

🔴वाय (Y) प्रकारची सुरक्षा व्यवस्था

तिसऱ्या क्रमांकाची ही सुरक्षा व्यवस्था आहे. महत्त्वाचे असणारे मात्र तुलनेने कमी धोका असेलेल्या व्यक्तींना वाय श्रेणीची सुरक्षा दिली जाते. या व्यवस्थेत एकूम 11 सुरक्षा रक्षक असतात. ज्यामध्ये दोन प्रशिक्षित जवान असतात.

🔴एक्स श्रेणी की सुरक्षा

एक्स प्रकारच्या सुरक्षा श्रेणीमध्ये दोन सुरक्षा रक्षक दिले जातात. देशात अनेक महत्त्वाच्या व्यक्तींना या प्रकारची सुरक्षा दिलेली आहे. या सुरक्षा व्यवस्थेत कोणत्याही प्रकारचे कमांडो नसतात.

दरम्यान, राज्यात अनेक राजकीय व्यक्तींच्या सुरक्षा व्यवस्थेत बदल केले आहेत. दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत राज्य सरकारने हा निर्ण घेतला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, भाजप आमदार प्रसाद लाड आदी नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थे मोठी कपात केली गेली आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

69 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!