Google Ad
Editor Choice india

Delhi : २ लाखांपर्यंत दागिने खरेदी करण्यासाठी लागणार KYC?अर्थ मंत्रालयाने दिली ही माहिती

महाराष्ट्र 14 न्यूज : अर्थ मंत्रालयाच्या सूत्रांनी शुक्रवारी अशी माहिती दिली आहे की सोनं, चांदी आणि मौल्यवान रत्ने तसंच खड्यांच्या रोख खरेदीसाठी संबंधी कोणतेही नवीन नियम लागू केले गेले नाहीत आणि केवळ जास्त किंमतीच्या खरेदीसाठी पॅनकार्ड, आधार किंवा इतर कागदपत्रे आवश्यक असतील.
दोन लाख रुपयांपेक्षा जास्त किंमतीचे दागिने खरेदीसाठी KYC आवश्यकता अर्थ मंत्रालयाच्या महसूल विभागाने 28 डिसेंबर 2020 रोजी जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की- 2 लाख रुपयांपेक्षा अधिक किंमतीचे दागिने, सोने, चांदी आणि मौल्यवान धातूंचे रत्ने आणि दागिने यांच्या खरेदीसाठी देशामध्ये गेल्या काही वर्षांपासून केवायसी जारी करण्यात आली आहे. आहे. ते अजूनही चालू आहे.

मनी लाँडरिंग अ‍ॅक्ट, 2002 (PML Act, 2002 अंतर्गत 28 डिसेंबर रोजी जारी केलेल्या अधिसूचनेत असे म्हटले आहे 10 लाख किंवा त्यापेक्षा अधिक किंमतीचे सोनं-चांदी, दागिन्यांच्या रोखीच्या व्यवहारासाठी केवायसीची कागदपत्रे भरावी लागतील. एफएटीएफ  अंतर्गत हे आवश्यक असल्याची  माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.  हा एफएटीएफ जागतिक स्तरावर तयार केला गेला आहे जो मनी लाँड्रिंग आणि दहशतवाद्यांना वित्तपुरवठा करण्याविरोधात काम करतो. 2010 पासून भारत एफएटीएफचा सदस्य आहे.

Google Ad

सूत्रांनी सांगितले की दागिन्यांच्या दोन लाख रुपयांपेक्षा जास्त रोख खरेदीवर केवायसी कागदपत्र भारतात आधीच अनिवार्य आहेत.  त्यामुळे अधिसूचनेत असा वेगळा खुलासा करण्यासाठी कोणतीही श्रेणी तयार केलेली नाही. दरम्यान, एफएटीएफ अंतर्गत ही एक आवश्यकता आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!