Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांसाठी ३१ ऑक्टोबर २०२० पर्यंत वाढवण्यात आलेल्या … लॉकडाउनचे काय आहेत सूचना आणि नियम!

महाराष्ट्र 14 न्यूज : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरात महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी, मनपा क्षेत्रामध्ये कोवीड -१९ च्या प्रसारास प्रतिबंधित करण्यासाठी सुधारित आदेश निर्गमित केले आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांसाठी लॉक डाऊन ३१ ऑक्टोबर २०२० पर्यंत वाढवण्यात आलेला आहे, यात काही सूचना आणि नियम दिले आहेत.

सदर आदेश दि . ०५/१०/२०२० पासून पुढील आदेश होई पर्यंत पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात लागू राहतील.

Google Ad

१ ) संपुर्णत : प्रतिबंधीत करणेत येत असलेल्या बाबी ३१/१०/२०२० अखेर -अशा असतील :-
🔴केंद्रिय गृह मंत्रालयाच्या परवानगी शिवाय इतर सर्व आंतरराष्ट्रीय विमानप्रवास
🔴 मेट्रो रेल प्रवास शाळा , कॉलेज , शैक्षणिक संस्था , प्रशिक्षण संस्था , कोचिंग क्लासेस दिनांक ३१/१०/२०२० अखेर बंद राहतील तथापी ऑनलाईन / दुरस्थ शिक्षण ( Distance learning ) सुरु राहील .
🔴सिनेमा हॉल ( मॉल व मार्केट कॉम्प्लेक्स मधिल सिनेमागृहा सह ) , व्यायामशाळा , जलतरण तलाव , सर्व प्रकारचे सभागृह , नाट्यगृह , मनोरंजन पार्क आणि तत्सम जागा
🔴सर्व प्रकारचे सामाजिक , धार्मिक , राजकिय , क्रीडा , मनोरंजन , सांकृतिक , शैक्षणिक उपक्रम , सभा संमेलन व तत्सम मोठ्या संख्येने लोक एकत्र येऊ शकतील अशा प्रकारचे कार्यक्रम सर्व धार्मिक स्थळे , सर्व धार्मिक कार्यक्रम , सभा , संमेलने बंद राहतील .

२ ) पिंपरी चिंचवड मनपा क्षेत्रातील सर्व व्यक्तींना घरा बाहेर पडताना मुखपट्टी ( Face mask ) वापरणे , सामाजीक अंतर ठेवणे व वैयक्तीक स्वच्छते विषयीचे सर्व नियम पाळणे बंधनकारक राहील .
पिंपरी चिंचवड मनपा क्षेत्रातील ६५ वर्षावरील सर्व व्यक्ती , अति जोखमीचे आजार ( मधुमेह , उच्च रक्त दाब , दमा , यकृत व मुत्रपिंडाचे आजार , कर्करोग , HIV बाधित रुग्ण इ . ) असलेल्या व्यक्ती , गरोदर महिला , वय वर्ष १० पेक्षा कमी वयोगटातील मुले यांना अत्यावश्यक सेवा व वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेर जाऊ नये .

प्रतिबंधित क्षेत्र ( कंटेनमेंट झोन ) – या कार्यालयाकडून वेळोवेळी घोषीत करणेत आलेल्या प्रतिबंधीत क्षेत्रामध्ये वैद्यकिय सेवा , अत्यावश्यक सेवा , अत्यावश्यक वस्तू पुरवठयाची साखळी कायम ठेवण्यासाठी आवश्यक वाहतुक वगळता प्रतिबंधीत क्षेत्रामधून नागरिकांना येणे – जाणे करणेसाठी प्रतिबंध असेल .
प्रतिबंधीत क्षेत्र ( कटेनमेंट झोन ) विषयक महानगरपालिकेने वेळोवेळी निर्गत केलेल्या आदेशातील सर्व सुचनांचे पालन करणे बंधनकारक राहील . सर्व आस्थापना प्रमुखांनी त्यांचे अधिनस्त कार्यरत कर्मचारी यांच्या सुरक्षिततेसाठी त्यांच्या भ्रमणध्वनीमध्ये आरोग्य सेतू अँप आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे स्मार्ट सारथी अँप डाऊनलोड केल्याची खात्री करून घ्यावी . आरोग्य सेतू अॅप च्या माध्यमातून रोगाची संभाव्य लागण विषयी सूचना प्राप्त होत असल्यामुळे व्यक्तीस स्वसंरक्षणासाठी त्याचा उपयोग होतो . स्मार्ट सारथी अँप मध्ये कोव्हीड -१९ बाबत विविध मार्गदर्शक सूचना , आपल्या आजूबाजूला उपलब्ध असणाऱ्या औषधाची दुकाने , महानगरपालिकेचे कोव्हीड -१९ फ्लू क्लिनिक या सोयीसुविधांची माहिती प्राप्त होते . सर्व अत्यावश्यक सेवा या पुर्वी दिलेल्या परवानगी नुसार सुरु राहतील .

शॉपीग मॉल , मार्केट कॉम्पलेक्स या पुर्वी दिलेल्या परवानगी नुसार सुरू ठेवता येतील . त्यामध्ये थिएटर बंद राहतील .
पिंपरी चिंचवड मनपा क्षेत्रात या आदेशामध्ये संपुर्णत : प्रतिबंधीत केलेल्या बाबी वगळता इतर सर्व उपक्रम दिनांक ५ अक्टोबर २०२० पासुन चालू ठेवण्यासाठी खालील अटी व शर्तीच्या अधिन राहून परवानगी देणेत येत आहे .

🔴यापुर्वी परवानगी देणेत आलेली अत्यावश्यक सेवा दुकानां व्यतिरीक्त इतर दुकाने , त्याकरीता निर्गमीत केलेल्या मार्गदर्शक सुचना नुसार सुरु राहतील .
🔴 यापुर्विचे दिनांक ०२ / ० ९ / २०२० चे आदेशा प्रमाणे हॉटेल आणि लॉजेस यांना १०० % क्षमतेसह सुरु ठेवण्यासाठी परवानगी असेल .
🔴फूड कोर्ट्स / रेस्टॉरंट्स आणि बार यांना ५० % क्षमतेसह सुरु ठेवण्यासाठी परवानगी असेल . त्यासाठी पर्यटन विभागा मार्फत स्वतंत्र मार्गदर्शक कार्यप्रणाली ( SOP ) निर्गमीत करण्यात येईल . सदर मार्गदर्शक कार्यप्रणाली ( SOP ) नुसार कामकाज चालु ठेवणे बंधनकारक असेल .

🔴ऑक्सिजन वायुची वाहतुक करणाऱ्या वाहनांना संपुर्ण दिवस वाहतुक करण्याची परवानगी असेल . तसेच ऑक्सिजन वायु निर्मिती करणाऱ्या कारखान्यांवर कोणत्याही प्रकारचे निबंध नसतील .
🔴मुंबई महानगर विकास प्राधिकरण क्षेत्रातील कार्यपद्धतीनुसार पिंपरी चिंचबर रेल्वे गाड्या सुरु करण्यात येतील . समन्वय ठेवण्यासाठी पुणे पोलिस अधिकारी असतील .

८ ) सर्व कार्यालयांमध्ये सामाजीक अंतर , मुखपट्टीचा वापर , वैयक्तीक स्वच्छता या निकषांच्या अंमलबजावणी साठी दक्षता अधिकारी यांची नियुक्ती करणे बंधनकारक असेल .

९ )प्रत्येक कार्यालयामध्ये थर्मल स्कॅनिंग , हॅन्ड वॉश आणि सॅनिटायझर यांची व्यवस्था सर्व प्रवेश व बहिर्गमन मार्गावर आसणे आवश्यक आहे . सर्व कर्मचाऱ्यांना मुखपट्टीचा वापर करणे बंधनकारक राहील .

१० ) पिंपरी चिंचवड मनपा कार्यक्षेत्रातील सर्व खाजगी आस्थापना ५० टक्के मनुष्यबळासह सुरु ठेवता येतील . तसेच सर्व अस्थापनांना त्याच्या कर्मचाऱ्यांसाठी कामावरुन घरी परत जाताना घ्यावयाच्या काळजी बाबत प्रशिक्षण आयोजीत करावे जेणेकरुन घरातील अती जोखमीच्या व्यक्ती व जेष्ठ नागरीक यांना कोविड १९ ची लागण होणार नाही . सर्व कार्यालयांमध्ये सामाजीक अंतर , मुखपट्टीचा वापर , वैयक्तीक स्वच्छता या निकषांच्या अंमलबजावणी साठी दक्षता अधिकारी यांची नियुक्ती करणे बंधनकारक असेल . कर्मचाऱ्याच्या कामाच्या वेळेत बदल करुन कामकाजाशी संबधीत व्यक्तींना ये जा करण्याची परवानगी देण्यात यावी .

११ ) सर्व प्रकारच्या मैदानी शारीरीक खेळ / व्यायाम यांना परवानगी राहील .

१२ ) सर्व सार्वजनिक ब खाजगी वाहतूक खालील प्रमाणे सुरु करता येईल . दुचाकी – चालक + एक ( हेल्मेट व मास्क वापरणे बंधनकारक ) तीन चाकी – चालक + दोन व्यक्ती चारचाकी / टॅक्सी कॅब – चालक + तीन व्यक्ती
कोवीड -१९ च्या प्रतिबंधासाठी या कार्यालयाब्दारे निर्गमित करणेत आलेल्या आदेशाचे उल्लंघन करणारा व्यक्ती , आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५१ ते ६० तसेच भारतीय दंड संहितेचे कलम १८८ अन्वये दंडनिय अपराध केला असे समजून कारवाईस पात्र राहील . सदर आदेश दि . ०५/१०/२०२० पासून पुढील आदेश होई पर्यंत पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात . लागू राहतील . हा आदेश आज शुक्रवार दिनांक २ अक्टोबर , २०२० रोजी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले.

Tags
Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!