Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड कोरोना अपडेट्स : शुक्रवार २ ऑक्टोबर २०२०

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज शुक्रवार ( दि. २ ऑक्टोबर २०२० ) रोजी पिंपरी चिंचवड शहरातील ६२४ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला असून या सर्वांवर महानगरपालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर १०४० रुग्ण हे कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

आज पिंपरी चिंचवड हद्दीमधील मृत झालेले रुग्ण हे १३ पुरुष – कुदळवाडी ( ४५ वर्षे ) , तळवडे ( ८३ वर्षे ) , मिलिंदनगर ( ६३ वर्षे ) , आकुर्डी ( ७ वर्षे ) , काळेवाडी ( ७१ वर्षे ५४ वर्षे ) , पिंपरी ( ७९ वर्षे ) , थेरगांव ( ४५ वर्षे ) , संत तुकाराम नगर , पिंपरी ( ६५ वर्षे ) , बोपखेल ( ४५ वर्षे ) , सांगवी ( ६२ वर्षे , २७ वर्षे ) , चिंचवड ( ५० वर्षे ) , १ स्त्री – कासारवाडी ( २४ वर्षे ) येथील रहिवासी आहेत

Google Ad

पिंपरी चिंचवड हद्दीबहेरील रहीवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे ६ पुरुष – गावडेवाडी ( ७५ वर्षे ) , धूल ( बा ) . आबेठाण ( ३७ वर्षे ) , ग्रेड ( ८० वर्षे , ५७ वर्षे ) , चाकण ( ६० वर्षे ) , १ स्त्री- जुन्नर ( ५४ वर्षे ) , येथील रहिवासी आहे .

माझे कुटुंब, माझी जबाबदारी सर्वेक्षण मोहिमेअंतर्गत आज अखेर १११४ पथकांद्वारे १९ ७९ ७४३ लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात आले असून त्यामध्ये १५४१ व्यक्तींच्या घशातील नमुन्यांची तपासणी केली असता ३६३ व्यक्ती कोवीड पॉझिटीव्ह आढळून आलेल्या आहेत .

पावसाळाअसल्यामुळे वैद्यकिय विभाग , पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की , अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये . तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता घ्यावी यासाठी किमान एक तरी अतिरिक्त ( Extra ) मास्क जवळ बाळगावा .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

4 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!