Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

भाजपा युवा मोर्चाच्या वतीने बोऱ्हाडे वाडी मोशी प्रभाग क्रमांक २ येथे महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती निमित्ताने सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार!

महाराष्ट्र 14 न्यूज : भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरात भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांच्या संयोजनातून, भाजप युवा मोर्चा पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष संकेत चोंधे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक २ बोऱ्हाडे वाडी मोशी येथे आज २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांच्या जयंती निमित्त सफाई कर्मचारी वर्गाचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.

जे सफाई कर्मचारी अहोरात्र मेहनत घेऊन आपला प्रभाग, आपलं शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नेहमी तत्पर असतात अश्या कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनिटायझर व गुलाबाचे फुल देऊन सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे प्रभागातील नागरिकांना प्लास्टिक बंदी चे महत्व सांगुन कागदी व कापडी पिशवीचा वापर करावा सांगण्यात आले, प्लास्टिक बंदी ही नावापुरती न करता समाजामध्ये प्लास्टिक बंदीचे महत्व पटवून देण्यात आले आणि त्यासाठी पर्यायी साधन म्हणुन कापडी किंवा कागदी पिशवी आहे हेही महत्त्वाचेच असे सांगण्यात आले. त्यासाठी सोसायटीच्या माध्यमातून जुने, जीर्ण व फाटके कपडे जमा केले व त्या कापडापासून पिशव्या बनवून ते जेष्ठ नागरिक, गरजू, कोरोना योद्धे यांना मोफत वितरित करणार असलेचे सांगण्यात आले.

Google Ad

सदर दोन्ही कार्यक्रमास प्रभागातील स्थानिक नागरिक व स्वच्छता कर्मचारी यांनी प्रचंड प्रतिसाद दिला, सदर कार्यक्रमाचे आयोजन हे भाजप युवा मोर्चा पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष अतुल बोराटे, भाजप युवा मोर्चा पिंपरी चिंचवड शहर चिटणीस रवींद्र जांभुळकर, भाजप युवा मोर्चा युवती सोशियल मीडिया संयोजिका पूजा आल्हाट यांनी केले होते.

या कार्यक्रमाला भाजप शहर अध्यक्ष आमदार महेश दादा लांडगे, प्रभाग क्रमांक २ चे नगरसेवक वसंत बोराटे, नगरसेविका सारिका बोऱ्हाडे, नगरसेविका अश्विनी जाधव, निलेशभाऊ बोराटे, सोनम जांभुळकर महिला मोर्चा उपाध्यक्ष, युवा नेते मंगेश हिंगणे, युवा नेते निखिल बोऱ्हाडे, निलेश तळेकर, भाजपा युवा अध्यक्ष संकेत चोंधे, वैद्यकीय अध्यक्ष विजया आल्हाट, स्वीकृत नगरसेवक सागर हिंगणे, निखिल बोऱ्हाडे, युवा नेतृत्व भानुदास आल्हाट, कार्यकारणी सदस्य सतीश जोरे, उदय गायकवाड, राजश्री शहा यांची ह्या कार्यक्रमाला उपस्थिती लाभली.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!