Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड शहर पदवीधर मतदानाकरीता सज्ज … पिंपळे गुरव शाळेत प्रशासनाची मतपेट्या आणि इतर यंत्रणा दाखल!

महाराष्ट्र 14 न्यूज : विधानपरिषदेकरिता शिक्षक व पदवीधरसाठी मंगळवार, १ डिसेंबर रोजी मतदान होत आहे. यासाठी प्रशासकीय पातळीवर सर्व यंत्रणा कामाला लागली असून पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे गुरव येथील जुनी मनपा शाळा येथील मतदान केंद्रावर पीएमपीएल बसने मतपेट्या, मतदानासाठी लागणारी साहित्य सामग्री घेऊन दुपारी दोन पासून उपस्थित होताना दिसून आले. यामध्ये मतदान अधिकारी, केंद्राध्यक्ष, कर्मचारी उपस्थित होते.

Google Ad

पिंपळे गुरव येथील जुनी मनपा शाळा येथे २२, २२A २२B, २२C केंद्रावर सायंकाळी पाच वाजता मतदानाची पूर्वतयारी करताना येथील अधिकारी व कर्मचारी दिसून येत होते यावेळी येथे निवडणूक अधिकारी जयश्री कवडे या ठिकाणी भेट देण्यास आले होते. येथील केंद्राची पाहणी करताना दिसून आले. ज्या अडचणी होत्या त्या त्यांनी त्वरित पूर्ण करून देताना दिसून आले.

या केंद्रावर पोलीस कर्मचारी, वाहतूक पोलीस उपस्थित होते. मतदाराला जुन्या पद्धतीने मतदान करावे लागणार आहे. यावेळी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान नसणार आहे. मतदाराला जुन्या पध्दतीत बॅलेट पेपर वर शिक्का मारून मतदान करायचे आहे. यासाठी प्रत्येक बॅलेट पेपरवर मतदान केंद्र व बूथ क्रमांकाचा शिक्का मारताना कर्मचारी दिसून येत होते.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!