Google Ad
Editor Choice Maharashtra

Jalgaon : बीएचआर घोटाळाप्रकरणात मोठ्या व्यक्तीचं नाव, एकनाथ खडसेंचा पत्रकार परिषदेत गौप्यस्फोट

महाराष्ट्र 14 न्यूज : बीएचआर गैरव्यवहार प्रकरणी 2018 पासून पाठपुरावा करत आहे. केंद्र शासनाकडून याची चौकशी करण्याचे आदेश असताना देखील त्‍यावेळी प्रकरण दडपण्यात आले. मात्र आता यातील सर्व सत्‍य बाहेर येणार असून, या प्रकरणात बड्या नेत्‍याचे नाव असून ज्‍याचा संबंध मंत्र्यांशी राहिला असल्‍याचा गौप्यस्‍फोट एकनाथ खडसे यांनी आज पत्रकार परिषदेत केला.  बीएचआर सहकारी बँकेतील घोटाळ्याप्रकरणी कारवाई सुरू असताना आज माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद बोलावली होती.

यावेळी सदर प्रकरणात पाठपुरावा करणाऱ्या ॲड. किर्ती पाटील देखील उपस्‍थित होत्‍या. खडसे यांनी सांगितले, की बीएचआरचा साधारण 1100 कोटी रूपयांचा घोटाळा आहे. याबाबत 2018 मध्ये ॲड. किर्ती पाटील यांनी राधा मोहन यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. त्‍यावेळी त्‍यांनी राज्‍य शासनाला सदर प्रकरणाची चौकशी इओडब्‍ल्‍यू यांच्या मार्फत करण्याचे आदेश काढले होते. मात्र या प्रकरणाची चौकशीत पुण्यात राजकीय व्यक्‍तीकडून दबाव आणण्यात आल्‍याने तात्‍पुरती स्‍वरूपाची चौकशी झाल्‍याचे दाखवून प्रकरण दडपण्यात आले.

Google Ad

इतकेच नाही, तर त्‍यावेळी विरोधी पक्षनेते असलेले धनंजय मुंडे यांनी देखील बीएचआरचे अवसायक असलेले कंडारे यांच्याकडे माहिती मागितली होती. मात्र त्‍यांनी दिली नाही. पण बीएचआरची प्रॉपर्टी कमी किंमतीत घेतल्‍याचे खडसे यांनी सांगितले. बीएचआर गैरव्यवहार प्रकरणी झालेल्‍या चौकशीदरम्‍यान सापडलेल्‍या कागदपत्रांमध्ये माजी मंत्री गिरीश महाजन यांचे लेटरपॅड आढळून आले आहे. याबद्दल बोलताना खडसे म्‍हणाले, की कोणाचे लेटरपॅड सापडले म्‍हणून त्‍याचा प्रकरणाशी संबंध येतो असे होत नाही. कारण कोणी चोरून देखील लेटर पॅड नेवू शकतो.

गिरीश महाजन यांनी या प्रकरणी राजकारण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला होता . त्यावर एकनाथ खडसे यांनी नुसता तोंडी बोलणं उपयोग नाही . पूराव्या शिवाय मी बोलत नाही. अशी प्रतिक्रिया देत कुठलेही पुरावे नसताना माझ्यावरती ही आरोप करण्यात आले होते. अनेक वर्ष माझावर अन्याय करण्यात आला. मी पुराव्याशिवाय आरोप करत नसल्याचे एकनाथ खडसे यांनी जळगाव येथे पत्रकार परिषदेत म्हंटले आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

13 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!