महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज सोमवार ( दि. ३० नोव्हेंबर २०२० ) रोजी पिंपरी चिंचवड शहरातील १७२ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला असून या सर्वांवर पिंपरी चिंचवड मनपा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर १७८ रुग्ण हे कोरोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहेत.
. आज पिंपरी चिंचवड हद्दीमधील मृत झालेले रुग्ण हे ०१ स्त्री- दापोडी ( ६१ वर्षे ) येथील रहिवासी आहेत . . पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवासी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे ०१ पुरुष -हिंजवडी ( ५० वर्षे ) येथील रहिवासी आहेत .
पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की , अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये . तसेच घराबाहेर पडताना मास्क चा वापर करावा.
3 Comments