Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

महाशिवरात्री व जागतिक महिला दिनानिमित्त शिवामृत ग्रुपच्या वतीने सांगवी येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन

महाराष्ट्र 14 न्यूज : महाशिवरात्री व जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने शिवामृत ग्रुप सांगवी यांच्या वतीने माहेश्वरी चौक येथे सकाळी होम हवन करून भगवान शंकरच्या मुर्तीस सांगवी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे यांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला व खिचडीचा महाप्रसाद वाटप करण्यात आले .

प्रवचनकार शारदताई मुंडे , अरूण पवार , रोहिदास बोऱ्हाडे , दत्रातय भोसले , गणेश ढमाले या मान्यवरांच्या हस्ते पिंपळे निलख दवाखान्याच्या प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ जयश्री शेलार, सुजाता निकाळजे, अदिती निकम, रोहिणी सुर्यवंशी, वनिता माकर , पिं चिं मनपाच्या प्रिती यादव, सुनिता बोत्रे , राजश्री बाईत , रंजना मोरे, रेबेका दास यांना शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

Google Ad

यावेळी शारदाताई मुंडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना प्रत्येकाने आपल्या मातेवर खूप खूप प्रेम करावे कधीही त्यांचाआपमाण करून नका कारण की माता आपले दुःख कधी दाखवत नाही ही मातेचे आपल्या वर प्रेम जसे मातेने आपल्याला लहान आसताना संभाळले तसेच त्यांना वयस्कर झाल्यावर संभाळावे असे मनोगत व्यक्त केले. विठ्ठल रूक्मीणी महिला भजनी मंडळ वरिल आळी दापोडी यांनी सुश्राव्य भजनाचा कार्यक्रम सादर करण्यात यावेळी पी एस आय भोंगळे साहेब , पोलीस शशिकांत देवकांत . राम पवार, बापुसाहेब पोटे , आदी शिवभक्त उपस्थित होते . कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रविंद्र बाईत यांनी केले व आयोजन व आभार विजयसिंह भोसले यांनी केले

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!