Google Ad
Editor Choice Maharashtra

Mumbai : MPSC परीक्षा आठवड्याभरातच होणार … आज तारीख जाहीर होणार … उद्धव ठाकरे

महाराष्ट्र 14 न्यूज : MPSC च्या विद्यार्थ्यांना झालेल्या गैरसोयीबाबत मी दिलगिरी व्यक्त करतो, असं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (11 मार्च) ऑनलाईन संवादात म्हटलं.

तसंच MPSC ची परीक्षा देण्यासाठी कुठल्याही विद्यार्थ्याला वयाच्या मर्यादेचं बंधन येणार नाही, असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. “14 तारखेची परीक्षा फक्त काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. मी स्वतः तारखांचा घोळ संपवा अशा सूचना सचिवांना दिल्या आहे. उद्या (12 मार्च 2021) ही तारीख जाहीर होईल. तसंच आठवडाभरातच ही परीक्षा होईल,” असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. “कोरोना वाढत आहे. लॉकडाऊन भागात असलेल्या परीक्षा केंद्राबाबत निर्णय घेण्यासाठी थोडा अवधी पाहिजे. विद्यार्थ्यांची सुरक्षा महत्त्वाची आहे,” असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी आणखी वेळ पाहिजे असल्याचं सांगितलं आहे.

Google Ad

सरकार विद्यार्थ्यांच्या करिअरचा खून करत आहे,” अशी प्रतिक्रिया भाजप आमदार गोपिचंद पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवेदनानंतर दिली आहे. तसंच आज रात्री पुण्याच्या रस्त्यांवरच आंदोलन करणार असल्याची घोषणा पडळकर यांनी केली. जोपर्यंच परीक्षा 14 तारखेलाच घेण्याची घोषणा होत नाही तोपर्यंत आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला होत. पण पोलिसांनी मात्र गोपीचंद पडळकर आणि त्यांच्याबरोबर आंदोलन करत असलेल्या काही मोजक्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि रस्ता मोकळा केला.

Tags
Google Ad

About the author

Maharashtra14 News

13 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!