Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

मंगळवार दि.६ ऑक्टोबर रोजी व बुधवारी सकाळचा संपूर्ण पिं.चिं. शहराचा पाणीपुरवठा कमी दाबाने व विस्कळीत होणार … निवेदन पहा!

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या जल उपसा केंद्र , रावेत येथील पंपगृहांमधील 22 के.व्ही. उच्चदाब वीज संच मांडणीचे अचानक उद्भवलेले उपस्कर वाहिनीचे तातडीचे दुरूस्ती काम करणेकामी मंगळवार दि.06.10.2020 रोजी स.11.00 ते 12.30 या कालावधी मध्ये जल उपसा बंद राहणार आहे.

पिंपरीचिंचवड महानगरपालिका पाणीपुरवठाविभागाचे वतीने कळविण्यात आले आहे, की मंगळवार दि.06.10.2020 रोजी दुपारी 12 नंतरचा, सायंकाळचा व रात्रीचा तसेच दूस-या दिवशी बुधवारी सकाळचा संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा कमी दाबाने व विस्कळीत होणार आहे,याची कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी व उपलब्ध पाणी जपून वापरून महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन रामदास तांबे सह शहर अभियंता (पाणी पुरवठा व जल निःसारण विभाग) पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी केले आहे.

Google Ad

Tags
Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!