Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

दिलासादायक : पिंपरी चिंचवड शहरातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या घटली … नागरिक आणि प्रशासनाच्या लढ्याला यश!

महाराष्ट्र 14 न्यूज : औद्योगिक नगरी म्हणून ओळख असलेल्या पिंपरी चिंचवडमधील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने घटली आहे. कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने घटल्याने पिंपरी चिंचवड महापालिकेनं उभारलेल्या कोविड सेंटरर्स पैकी तब्बल ५ कोविड सेंटर बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

शिवाय पिंपरीत उभारलेल्या जम्बो कोविड सेंटरमध्ये भरती होणाऱ्या रुग्णांची संख्याही अर्ध्यावर आल्याने पिंपरीत कोरोनाचा जोर ओसरल्याचं दिसत आहे.

Google Ad

पिंपरी चिंचवड पॉलिटेक्निक कॉलेज, आकुर्डी, म्हाडा गृहनिर्माण वसाहत कोविड सेंटर माळुंगे, चाकण, बालाजी ग्रुप ऑफ इन्सिट्यूट कॉलेज, ताथवडे, सिम्बायसिस स्किल डेव्हलपमेंट कॉलेज, किवळे आणि डॉ. वाय. पाटील मुलींचे वसतीगृह येथील हे पाच कोविड सेंटर बंद करण्यात आले आहे.

कोरोनाला प्रतिबंधित करण्यासाठी पिंपरी चिंचवडकर नागरिक आणि प्रशासनाच्या देत असलेल्या लढ्याची ही यशस्वी वाटचाल म्हणता येईल.

दरम्यान, ५ ऑक्टोबर रोजीपर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार, पिंपरी चिंचवडमध्ये दिवसभरात ४४३ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात ८३३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर १८ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे .यातील १३ रुग्ण पिंपरी चिंचवड शहरातील तर ५ रूग्ण पिंपरी चिंचवड शहराबाहेरील आहेत. तर ३४५१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पिंपरी चिंचवड मधील आजपर्यंत एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ८०९२३ वर पोहोचली आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

9 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!