Google Ad
Editor Choice Education

, द न्यू मिलेलियम इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये बाल दिनाच्या निमित्ताने कौशल्य विकास कार्यक्रमाचे आयोजन

महाराष्ट्र 14 न्यूज, (दिनांक – १६ नोव्हेंबर २०२२ ) : बालकांच्या हक्काचे रक्षण , त्यांना शिक्षण, पोषण,तसेच त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे, मुलांमध्ये विचार करण्याची क्षमता वाढवणे, त्यांचे विचार प्रगल्भ करणे,त्यांच्या सुप्त गुणांना वाव देत त्यांच्या जवळचे कौशल्य वाढवणे, या गोष्टी विचारात घेऊन प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचलित, द न्यू मिलेलियम इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये बाल दिनाच्या निमित्ताने अनेक उपक्रम राबविले जात आहे.हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून ‘फिन्याप असोशियन आयडिया बाज क्लब, या संस्थेमार्फत महाराष्ट्रातून पहिला उपक्रम द न्यू मिलेलियम इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये राबविला गेला.

फिण्याप संस्थेच्या माध्यमातून मुलांमध्ये जे सूक्त गुण असतात , जी प्रतिभा असते यास वाव मिळावा म्हणून, तसेच त्यांचा शारीरिक ,मानसिक, बौद्धिक विकास व्हावा यासाठी ही संस्था वेगवेगळे उपक्रम राबवते. त्यातील पहिला मान हा द न्यू मिलेलियम इंग्लिश मीडियम स्कूलला मिळाला.बाल दिनाचे औचित्य साधून हा उपक्रम सुरू केल्याने मुलांमध्ये अतिशय उत्साह दिसत होता.सगळे मुलं वेगवेगळे बौद्धिक गेम पूर्ण करताना आपले कौशल्य पणाला लावत होते. त्यातूनही ते खूप आनंदी दिसत होते. असे म्हणतात की इमारतीचा पाया जितका मजबूत असेल तितकी इमारत मजबूत होईल. म्हणून आधी मुलांचा पाया मजबूत केला पाहिजे. आणि
याचेच औचित्य साधून आपल्या भारताचे पहिले दिवंगत पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी करण्यात आली.

Google Ad

त्यांना लहान मुले खूप प्रिय होते. म्हणून त्यांच्या स्मरणार्थ अनेक उपक्रमांनी बालदिन साजरा करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.या कार्यक्रमासाठी असोसिएशनचे प्रमुख अध्यक्ष मा.अविनाश देशमुख, मा.निलेश राहाटे, डायरेक्टर मा.चिन्मय कवी , एज्युकेशन हेड मा.अमृताताई बोकील , मा.लीना ताई गोडबोले, मा.वरूनसर व सर्व सभासद मुलांना ज्ञानदान देण्याचे काम करत होते.

कॉलेजच्या प्राचार्या इनायत मुजावर मॅडमच्या नेतृत्वाखाली सर्व क्लास व विद्यार्थी अत्यंत शिस्तबद्ध अशा पद्धतीने सर्व उपक्रमांची मजा अत्यंत आनंदाने अनुभवत होते.अशा या स्तुत्य कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष मा लक्ष्मणभाऊ जगताप , उपाध्यक्ष विजूअन्ना जगताप , सचिव शंकरशेठ जगताप, सदस्या स्वाती पवारमॅडम, मा. देवराम पिंजण सर व सर्व संचालक मंडळ प्राचार्या इनायत मुजावर मॅडम मुख्याध्यापिका जयश्री माळी मॅडम व सर्व शिक्षक वृंद यांनी मुलांना शुभेच्छा देऊन सर्वांचे कौतुक केले. त्यामुळे मुलांचा आनंद अजून द्विगुणीत होऊन त्यांनी या वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये सहभागी होऊन खूप आनंद घेतला.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!