Google Ad
Editor Choice

West Bengal : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना एका सभेला संबोधित करताना अचानक आली चक्कर

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१७ नोव्हेंबर) : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची अचानक तब्येत बिघडली आहे. येथील एका सभेला संबोधित करताना त्यांना अचानक चक्कर आली. त्यामुळे कार्यक्रम थांबवावा लागला. यापूर्वीही दोनदा नितीन गडकरी यांना सभांमध्ये भाषण करत असताना चक्कर आली होती. त्यावेळीही कार्यक्रम थांबवावे लागले होते. दरम्यान, गडकरी यांची प्रकृती चांगली असल्याचं सांगितलं जात आहे.

नितीन गडकरी हे पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. परिवहन आणि राष्ट्रीय राजमार्गाच्या कार्यक्रमालाच्या कार्यक्रमासाठी ते सिलीगुडीला आले होते. यावेळी त्यांच्या हस्ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 चे भूमिपूजन करण्यात आले. 1206 कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प राबवण्यात येत आहे.

Google Ad

या प्रकल्पाच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने सिलीगुडी येथे जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी नितीन गडकरी बोलण्यासाठी उभे राहिले. त्यांनी भाषणाला सुरूवातही केली. भाषण सुरू असतानाच अचानक त्यांना गरगरल्या सारखं झालं. त्यामुळे त्यांनी तात्काळ भाषण थांबवलं आणि खुर्चीवर जाऊन बसले.

त्यांची तब्येत बिघडल्याचं लक्षात आल्याने स्टेजवरील नेत्यांनी त्यांना प्यायला पाणी दिलं. थोडावेळ बसल्यानंतर त्यांना बरं वाटू लागल्याचं सांगण्यात आलं. नितीन गडकरी यांची प्रकृती चांगली असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!