Google Ad
Editor Choice Front

आनंदाची बातमी; येथे १२ लाख लोकांना रोजगार … !

महाराष्ट्र 14 न्यूज : करोना व्हायरसमुळे निर्माण झालेले आर्थिक संकट त्यामुळे पगार कपात आणि कामगार कपातीच्या बातम्या रोज येत आहेत. अशातच एक दिलासा देणारी बातमी आली आहे. इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात प्रॉडक्शन लिंक्ड इंसेंटिव्ह (PLI)नुसार भारतात २२ कंपन्या गुंतवणूक करणार आहेत. यात काही विदेशी कंपन्यांचा समावेश असून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार आहे.विशेष म्हमजे पीएलआय नुसार भारतीय स्मार्टफोन बाजारात ७० टक्के हिस्सा असलेल्या चीनच्या चार कंपन्यांचा यात समावेश करण्यात आला नाही. यात शाओमी, ओप्पो, व्हिवो आणि रिअल मी यांचा समावेश आहे. आयटी आणि इलेक्ट्रॉनिक्स मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील पाच वर्षात इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात ११.५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. त्यामुळे ३ लाख प्रत्यक्ष तर ९ लाख लोकांना अप्रत्यक्षरित्या रोजगार मिळणार आहे.

एप्रिल महिन्यात आयटी आणि इलेक्ट्रॉनिक्स मंत्रालयाने पीएलआय योजनेची घोषणा केली होती. यानुसार भारतात उत्पादन सुरू करण्यासाठी ३१ जुलै पर्यंत अर्ज दाखल करायचे होते. फोन निर्मिती करणाऱ्या क्षेत्रात सॅमसंग, फॉक्सकॉन हॉनहॉय, राइजिंग स्टार, विस्ट्रॉन आणि पेगाट्रॉन सारख्या कंपन्यांनी रस दाखवला आहे. यातील फॉक्सकॉन हॉनहॉय, विस्ट्रॉन आणि पेगाट्रॉन या कंपन्या अॅपलसाठी उत्पादन करतात.भारतीय कंपन्यांपैकी लाव्हा, डिक्सन टेक्नोलॉजी, मायक्रोमॅक्स, पॅडगेट इलेक्ट्रॉनिक्स, सोजो मॅन्यूफॅक्चरिंग सर्व्हिसेस आणि ऑप्टिमस इलेक्ट्रॉनिक यांचा समावेश आहे.

Google Ad

या योजनेनुसार मोबाइल निर्मिती करणाऱ्या या कंपन्याचे काम १५ ते २० टक्क्यांवरून वाढून ते ३५ ते ४० टक्क्यांपर्यंत जाईल. पीएलआय योजनेनुसार सरकार कंपन्यांना ४१ हजार कोटी रुयपांचे इसेंटिव्ह देणार आहे. भारत मोबाइल निर्मिती क्षेत्रात दुसऱ्या क्रमांकावर आहे. सरकारला पहिले स्थान मिळवाचे आहे.

Tags
Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!