Google Ad
Editor Choice Maharashtra crimes Pune

Pune : पोलिसांनी काढला इंजिनिअरचा, व्हायरस!

महाराष्ट्र 14 न्यूज : उत्तमनगर पो.स्टेशनमध्ये रात्रपाळीला असलेले पो.उप.नि. अभिजीत ढेरे यांना अनोळखी क्रमांकावरून फोन आला . फोन करणार्याने एक पत्ता देऊन तिथे आत्महत्या घडत असल्याचे सांगितले . हे कळताच क्षणाचाही वेळ न दवडता आपले सहकारी पो.ना. शिवडकर व भुरूक यांना घेऊन ढेरे ताबडतोब घटनास्थळी पोहचले . तिथं दिसलं की , एक तरूण खिडकीतून उडी मारून जीव देण्याच्या प्रयत्नात आहे .

Google Ad

पोलीसांनी त्वरित हालचाली करून त्या तरूणाचं घर गाठून त्याला ताब्यात घेतलं . तो तरूण दारूच्या नशेत होता . थोडी नशा उतरेपर्यंत पोलीसांनी संयमाने वाट पाहिली . त्यानंतर त्या तरूणाकडून कळलं की , तो सॉफ्टवेअर इंजिनिअर असून घरगुती भांडणातून जीव द्यायला निघालेला होता . मग पोलीसांनी घरच्यांशी संपर्क साधला आणि तरूणालाही धीर देऊन आत्महत्येचा ‘ व्हायरस’त्याच्या डोक्यातून कायमचा काढून टाकला .

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!