Google Ad
Editor Choice Pune

Pune : पुणे शहरातील रात्रीची संचारबंदी हटवली!

महाराष्ट्र 14 न्यूज : करोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे शहरात रात्री नऊ ते पहाटे पाचपर्यंत असलेली संचारबंदी अखेर मागे घेण्यात आली आहे . त्यामुळे गेल्या चार महिन्यांपासून असलेली संचारबंदी कमी झाल्याने नागरिकांना रात्रीही फिरता येणार आहे . पुणेकरांसाठी हा खूप मोठा दिलासा आहे . राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर २४ मार्चनंतर लॉकडाऊन घोषित करण्यात आले होते . पूर्ण राज्यात २४ तास संचारबंदी लागू करण्यात आली होती .

त्यानंतर एक जून पासून दिवसा असलेली संचारबंदी कमी करून फक्त रात्री नऊ ते पहाटे पाचपर्यंत संचारबंदी ठेवण्यात आली होती . रात्री संचारास प्रतिबंध घालण्यात आला होता . आता शासनाने एक ऑगस्टपासून संचारबंदीचा कोणताही आदेश काढलेला नाही . त्यामुळे नागरिकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता . पण , रात्रीची संचारबंदी शासनाने मागे घेतल्यामुळे आदेश काढण्यात आला नसल्याचे समोर आले आहे . तरीही नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये . आवश्यक असेल तरच बाहेर पडावे , असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे .

Google Ad
Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!